Sugarcane  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Harvesting : सिंधुदुर्गात १५ हजार टन ऊसतोडणी शिल्लक

२० ऑक्टोबरला यावर्षीच्या गाळप हंगामाला सुरुवात झाली. त्यानंतर तब्बल दोन महिन्यांत जिल्ह्यातील अवघ्या ४ हजार टन उसाची तोडणी झाली होती.

Team Agrowon

Sugarcane Season Sindhudurag News : जिल्ह्यात आतापर्यंत ४१ हजार टन उसाची तोडणी (Sugarcane Harvesting) पूर्ण झाली असून अद्याप १५ हजार टन ऊसतोडणी शिल्लक आहे. जिल्ह्यात १०५ तोडणी गट कार्यरत आहेत. ५ मार्चपर्यंत तोडणी पूर्ण करण्याचा कारखाना प्रशासनाचा मानस आहे.

जिल्ह्यातील बहुतांश ऊस असळज (ता. गगनबावडा, जि. कोल्हापूर) येथील डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखान्याला जातो. या उसाची वाहतूक करूळ घाटमार्गे केली जाते.

परंतु हा घाटमार्ग अवजड वाहतुकीस धोकादायक असल्यामुळे यावर्षीदेखील जिल्ह्यातील ऊसतोडणीला विलंबाने सुरुवात झाली.

२० ऑक्टोबरला यावर्षीच्या गाळप हंगामाला (Sugarcane Crushing Season) सुरुवात झाली. त्यानंतर तब्बल दोन महिन्यांत जिल्ह्यातील अवघ्या ४ हजार टन उसाची तोडणी झाली होती. तीन ते चार तोडणी गट कार्यरत होते. परंतु गेल्या दीड महिन्यापासून कारखान्याने तोडणी गटांची संख्या वाढविली.

आतापर्यंत जिल्ह्यातील ४१ हजार टन उसाची तोडणी करण्यात आली आहे. वैभववाडी, कणकवली, कुडाळ आणि मालवण या चार तालुक्यांतील १५ हजार टन उसाची तोडणी शिल्लक आहे.

यासंदर्भात कारखान्याचे पर्यवेक्षक बी. जी. शेळके यांनी सांगितले, की सुरुवातीला धिम्यागतीने ऊसतोडणी सुरू होती. परंतु आता गती वाढविली असून १०५ तोडणी गट काम करीत आहेत. कोणत्याही परिस्थितीत ५ मार्चपूर्वी तोडणी पूर्ण करणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sesame Crop Harvesting: तीळ पिकाची लवकर मळणी शक्य

Marathwada Water Right Protest: मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी आंदोलन सुरू; समन्यायी पाणीवाटप संघर्ष समितीचा पुढाकार

E-Pramaan Service: ई-प्रमाण सेवेमुळे दस्तांची प्रमाणित प्रत मिळणार ऑनलाइन: मुद्रांक जिल्हाधिकारी संदीप आहेर

Bhimashankar Tourism Development Plan: भीमाशंकर विकास आराखड्याला गती द्या : जिल्हाधिकारी डुडी

Bajra Farming: बाजरीचे पीक फुलोऱ्यात

SCROLL FOR NEXT