Sugarcane Harvest : ऊस तोडणी-वाहतुकीतील कष्ट-खर्च करूया कमी

जागतिक वाहतूक शास्त्रानुसार टनांमध्ये ज्या वस्तूंची वाहतूक करायची असते, अशा वाहतुकीसाठी युनिट लोड डिव्हाइसेस व मेकॅनाइज्ड लोडिंग/अनलोडिंग पद्धत वापरली जाते.
Sugarcane Harvest
Sugarcane HarvestAgrowon
Published on
Updated on

जागतिक वाहतूक शास्त्रानुसार टनांमध्ये ज्या वस्तूंची वाहतूक करायची असते, अशा वाहतुकीसाठी युनिट लोड डिव्हाइसेस व मेकॅनाइज्ड लोडिंग/अनलोडिंग पद्धत वापरली जाते. जगभरात मोठा व्यापार चालतो तो जलमार्गाने, आता कंटेनर वाहक दोन लाख टन क्षमतेपर्यंतची एकेक जहाजे महासागरातून हजारो मैल वाहतूक करतात.

त्यासाठी रस्ता बनवावा लागत नाही. जमीन खरेदी करावी लागत नाही. जलवाहनाला रस्त्यावरच्या वाहनाइतका बांधणीचा खर्च नसतो. म्हणून रस्ते वाहतूक खर्चाच्या २५ टक्के खर्चात जलवाहतूक करता येते. त्यानंतर रेल्वे मोठ्या प्रमाणात वाहतूक करते. थेट दिशा व सपाट जमिनीवर रूळ त्यामुळे उंचवटे, वळणे, खड्डे नसतात. ८० ते १०० वॅगनची गाडी १२०० ते १५०० टन प्रत्येकी वाहतूक करते. त्यासाठीही जहाजाप्रमाणे जगभर कंटेनर वापरले जातात, त्याचेही मेकॅनाइज्ड लोडिंग/अनलो़डिंग केले जाते. रस्ते वाहतुकीच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी खर्चात रेल्वे वाहतूक होते.

आपण भारतीय २० टनी ट्रक, १० टनी ट्रक, ७ टनी व ३ टनी वाहनांद्वारे माल वाहतूक करतो. ऊस वाहतुकीचा विचार केल्यास शेत, सऱ्या वरंबे, पाट, बांध, उंचसखल खड्डेमय व रस्त्यात दुसऱ्या शेतकऱ्यांची शेती, झाडे, छोटे रस्ते यातून फक्त ट्रक वा ट्रॅक्टर ट्रॉलीने ऊस वाहतूक केली जाते. प्रत्येक कारखान्याचा ऊस, साखर व इतर पदार्थांची साधारणतः १० लाख टनांपेक्षा जास्त वाहतूक दरवर्षी होते.

पण शास्त्राप्रमाणे मेकॅनाइज्ड लोडिंग/अनलोडिंग केली जात नाही, तर फक्त मॅन अथवा मशिन असा प्रघात पडला आहे. शास्त्रानुसार लोडिंगसाठी कन्वेयर बेल्ट, फोर्कलिफ्ट, क्रेन वापरली जाते. ५ ते १० फुटांपर्यंतच चालणे व कमाल ४ ते ५ फूट उंचावर/अंतरावर ठेवणे एवढेच मानवी श्रम वापरले जातात. म्हणजे मॅन, मशिन व मेकॅनिझमचा योग्य समन्वय केला जातो. आपल्याकडे फक्त फडकरी वापरून शेतापासून फर्लांगभर चालणे, १५ फूट चढून मोळी देणे व उतरून परत तेवढे अंतर रिकामे येणे हेच चालू आहे.

Sugarcane Harvest
Farmer Incentive Scheme : पन्नास हजार शेतकरी‘प्रोत्साहन’च्या प्रतीक्षेत

संपूर्ण ऊस साधारण २० किलो वजनाच्या मोळीच्या प्रमाणात लोडिंग केला जातो. हे पूर्णपणे शास्त्राविरुद्ध आहे. त्याऐवजी कॅरेज (लांबची वाहतूक) व कार्टेजचा (कॅरेजला फिड करणारे छोटे वाहन) वापर करणे आवश्यक आहे. असे केल्यास १० टनी वा २० टनी गाडी भरायला १० ऐवजी सातच मजूर लागतील. हे अवघड काम टाळण्यासाठी शेतकरी व स्थानिक वाहनधारक मराठवाड्यातून गरजू कामगारांना आणून ऊसतोडणी करतात.

कार्टेज शास्त्र व मेकॅनाइज्ड लोडिंग वापरून सर्व काम सहज व कमी खर्चात कमी वेळेत करता येते. चालणे व ट्रॉलीवर चढणे बंद झाल्याने तेवढ्या वेळात कमी श्रमात इतर काम दुप्पट वेगाने होते. शेतकरी स्थानिक कामगार घेऊन इतर पिकांप्रमाणे ऊसतोडणीही स्थानिक स्तरावर करू शकतात. वाहतुकीत प्रतिटन ३०० रुपयांची बचत होऊ शकते.

त्यामुळे टोळ्या ठरवणे, लाखो अॅडव्हान्स देणे, १५ ऐवजी ७ ते ८ मजूर येणार, पूरबाधित ऊस तोडणार नाही, जळलेला ऊस तोडणार नाही, शेतकऱ्याकडून जास्त अंतर वाहतूक आहे म्हणून एवढे हजार जास्त द्या, कोयता पूजन पैसे द्या, बक्षीस, पार्टी जेवण यासाठी पैसे द्या हे सारेच अशास्त्रीय आहे. त्यात वाहनधारक व शेतकरी यांच्यावर जबाबदारी ढकलून कारखाना पळ काढतोय?

Sugarcane Harvest
CIBIL Agri Loan: शेती कर्जांना ‘सीबील’मधून वगळण्याच्या मागणी | ॲग्रोवन

साखर कारखान्याच्या अंतर्गतची वाहतूक योजना ही मशिन बनवणाऱ्यांच्या यंत्रानुसार आहे. वाहतूक शास्त्राचा कुठेच वापर केला जात नाही. तसेच हजारो मैल लाखभर टन दरवर्षीची साखर वाहतूक यासाठीही शास्त्र वापरले जात नाही. मालवाहतूक ही एकतर्फे असते. त्यामुळे जवळ अथवा हजारो मैलावर साखर पाठवताना परतीचे वाहन रिकामे येण्याचा खर्च केला जातो. वाहतूक शास्त्र वापरून प्रत्येक क्विंटलला किमान १०० रुपये वाचवता येतात. अभ्यासानंतर आणखी साधारणतः ५० रुपये प्रति क्विंटलपर्यंत वाचवणे शक्य आहे.

ऊस भरून आलेला ट्रक व ट्रॅक्टर कारखान्यावर १२ ते १५ तास नंबर येण्यासाठी वाट पाहत बसतो. म्हणजे वाहन, चालक यांची उत्पादकता वाया जाते. तेही शेतकऱ्यांच्याच माथी मारले जाते. शास्त्रानुसार एकूण वाहतुकीच्या गरजेनुसार, वाहतुकीतल्या युनिटबरोबर बेस युनिटची संख्या वाढवावी लागते.

ती कारखान्यावर व भरणीसाठी फडात असावी लागते. याचे नियोजनच नसल्याने सारे अव्यवस्थित आहे. या नॉनपावर्ड बेस युनिटची संख्या नियोजनानुसार केल्यास कुठलेही वाहन कारखान्यावर अर्ध्या तासापेक्षा जास्त थांबवण्याची गरज नाही. त्यामुळे फेऱ्यांची संख्या दुप्पट करता येते. तसेच उसाच्या फडातही वाहन अर्ध्या तासापेक्षा जास्त थांबवण्याची गरज नाही.

Sugarcane Harvest
Onion Plant : भाऊ, दादा आम्हलेही कांदानं उळे मिळई का!

ऊस क्षेत्रात प्रत्येक फडाला लागून रस्ता नसतो तर अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून अथवा एकाच शेतकऱ्याच्या अनेक प्लॉटमधून वाहन न्यावे लागते. त्यात शेती, पिके, सरी-वरंबे ऊस तोड झालेला प्लॉट, पड जमीन असते. अशा तऱ्हेने आतल्या शेवटच्या प्लॉटला जावे लागते. त्या सर्वांतून भरलेले, १० ते १५ टनी वाहन बाहेर आणावे लागते.

अशी सर्व प्लॉटची तोडणी संपेपर्यंत सतत वाहतूक चालते. त्यामुळे ऊस भरलेल्या वाहनाच्या दाबामुळे जमीन अतिघट्ट होते. ती नांगरून, ढेकळं फोडून तयार केली तरी भुसभुशीत होत नाही. म्हणजे पुढच्या पिकांच्या उगवणी व उत्पादनात मोठी घट होते. हे टाळण्यासाठी कार्टिंग युनिट ही शास्त्रीय योजना आहे. ट्रक अथवा ट्रॅक्टर अगदी उसाच्या फडात उभा केला तरीही १० ते २० टन ऊस उचलणे म्हणजे तेवढे वाहनापासूनचे अंतर वाढत जाते तेथेही वाहतूक व चढण यापासून सुटका होत नाही.

म्हणून मोठे वाहन रस्त्यावर अथवा प्रशस्त जागेवर व कार्टिंगने ऊस बाहेर काढणे हेच योग्य होय. प्रत्येक बाब ही श्रम, वेळ खर्च यांची तुलना करून ठरवल्यास खात्री पटेल. सध्या ऊस शेताबाहेर आणण्याची समस्या व मधल्या भागातील शेतकऱ्यांच्या तक्रारी, नुकसान, तंटे सुरू आहेत त्यावर कार्टिंग हा कायमचा उपाय पाहिजे.

ऊस वाहतुकीत ट्रॅक्टर ट्रॉली भरताना बेहिशेबी ऊस भरायचा म्हणून वाकडा ऊस व ट्रॉलीच्या मागे/पुढे तसेच रुंदीचा व मुख्यत्वे उंचीचा विचार केला जात नाही. त्यामुळे उंची वाढून गुरुत्वमध्य उंचावर जातो व ट्रॉली पलटी होण्याचा धोका वाढतो. शेत, पाणंद, छोटे रस्ते यासह सर्वत्र खड्डे, उंचसखल रस्ते व ड्रायव्हरला मागचे काही दिसत नाही. मागच्या वाहनांना ओव्हरटेक करताना रस्ता अडवला जातो. त्यामुळे अपघात होतात.

दुचाकीचे अपघात तर सतत चालू आहेत. ट्रॉली भरण्याची उंची व रुंदी हवी त्या मर्यादेत ठेवण्यासाठी जागतिक वाहतूक शास्त्रात काँटूर स्केल वापरले जाते. याचा वापर केल्यास उंची व रुंदी आपण ठरवू तेवढीच ठेवता येते. याशिवाय वाहन आवळणी शास्त्रानुसार ऊस आवळणीच्या रोपला टाइंग रिंग बसवून आठ-दहा सिंगल रोपची लांबी प्रमाणित करून उंची, रुंदी प्रमाणित ठेवता येते.

त्यामुळे अवाढव्य घातक यंत्रणेऐवजी शास्त्रीय पद्धतीने प्रमाणित आकार व उंची यामुळे कारखान्यापर्यंत जाण्याचा वेग इतर वाहनांप्रमाणे वेगाने करून अपघात कमी करता येऊ शकतात. तसेच इतर वाहनांना अडथळा न होता त्यांच्याप्रमाणे ड्रायव्हिंग सहज होते. या सर्व बाबींचा विचार झाला पाहिजे.

(लेखक वाहतूक व्यवसायात

कार्यरत आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com