Sugarcane Season Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season 2024 : कृष्णा कारखान्याचे १५ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट

Sugarcane Crushing : कृष्णा कारखान्यात गाळपासाठी अत्याधुनिक मशीनरी बसविण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त गाळप शक्य होणार आहे.

Team Agrowon

Satara News : कृष्णा कारखान्यात गाळपासाठी अत्याधुनिक मशीनरी बसविण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त गाळप शक्य होणार आहे. या हंगामात १५ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असे प्रतिपादन य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी केले आहे.

रेठरे (ता. कऱ्हाड) येथील कृष्णा कारखान्याच्या ६५ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ डॉ. सुरेश भोसले आणि उत्तरा भोसले यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून ६५ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी उपाध्यक्ष जगदीश जगताप, संचालक धोंडिराम जाधव, निवासराव थोरात, बाबासो शिंदे, बाजीराव निकम, शिवाजी पाटील, दत्तात्रय देसाई, जे. डी. मोरे, विलास भंडारे, वसंतराव शिंदे, अविनाश खरात, श्रीरंग देसाई, दीपक पाटील, कार्यकारी संचालक महावीर घोडके, मनोज पाटील, वैभव जाखले यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. अतुल भोसले म्हणाले, निवडणुकीच्या निमित्ताने केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह कऱ्हाडला आले असता, त्यांच्याकडे सहकारी उपसा जलसिंचन योजनांना सहकार्य करण्याची मागणी केली होती. या बाबत त्यांनी सकारात्मकता दर्शविली असून, कारखान्याच्या संचालक मंडळाने प्रस्ताव दिल्यास केंद्र सरकारच्या माध्यमातून कृष्णा कारखाना संलग्नित सहकारी तत्त्वावरील उपसा जलसिंचन योजनांना मदत मिळू शकेल.

कारखान्याचे चांगल्या पद्धतीने आधुनिकीकरण झाल्याने, यंदाचा हंगाम यशस्वीपणे पार पडेल. प्रारंभी संचालक जे. डी. मोरे व त्यांच्या पत्नी सुमित्रा मोरे यांच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात आली. या वेळी कारखान्याचे सभासद, बिगर सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस वाहतूकदार, कंत्राटदार, व्यापारी, कारखाना अधिकारी, कर्मचारी यांची मोठी उपस्थिती होती.

यंदाचा गळीत हंगाम सुरळितपणे पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. तोडणी कार्यक्रम वेळापत्रकानुसार काटेकोरपणे राबविण्याचे निश्चित करण्यात आले असून, तोडणीबाबतच्या अडचणी सोडविण्यासाठी कारखान्याच्या वतीने हेल्पलाइन सुरू करण्यात येणार आहे.
- डॉ. सुरेश भोसले, अध्यक्ष

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Industry: उद्योगाचा गाडा रुळावर आणा

Vice President Election 2025 : उपराष्ट्रपती पदासाठी मतदान सुरु, पंतप्रधान मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

Jayakwadi Dam: ‘जायकवाडी’ ९९.२८ टक्क्यांवर

ISO Certification: महावितरणच्या सहा कार्यालयांना एका वेळी ‘आयएसओ’ प्रमाणपत्र

Youth Empowerment: राज्यात ७५ हजार युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देणार : मंत्री मंगलप्रभात लोढा

SCROLL FOR NEXT