Water Bunds  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Bunds : इंदापुरातील बंधाऱ्यांसाठी १५ कोटींचा निधी मंजूर

Water Conservation : दुष्काळी परिस्थितीत शेतीला आणि पिण्याला पाणी उपलब्ध व्हावे, या साठी ठिकठिकाणी साठवण बंधारे बांधण्यात येत आहेत.

Team Agrowon

Pune News : ‘‘इंदापूर तालुक्यातील साठवण तलाव व साठवण बंधारे बांधण्यासाठी सुमारे १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे,’’ अशी माहिती आमदार दत्तात्रेय भरणे यांनी दिली.

दुष्काळी परिस्थितीत शेतीला आणि पिण्याला पाणी उपलब्ध व्हावे, या साठी ठिकठिकाणी साठवण बंधारे बांधण्यात येत आहेत. यासाठी जलसंधारण विभागाद्वारे तालुक्यामध्ये नव्याने साठवण तलाव व बंधारे बांधण्यासाठी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

भरणे म्हणाले, ‘‘इंदापूर तालुक्यासाठी निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्नशील आहे. येत्या काळात इंदापूर तालुक्यातील नागरिकांसाठी विविध विकासकामांच्या निधीची भेट देण्यात येईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून भरघोस निधी आणण्यात येईल.’’

बंधारे होणाऱ्या गावांची नावे आणि निधी (कंसात लाखांत) : भादलवाडी (५०.३३ लाख), बिजवडी (४९.८८ ), गोखळी (४८.५३), कळस (५८.५६), कळस (३७.६३), खोरोची (३९.४५), निरगुडे (५७.१९), पोंदकुलवाडी (३६.६१) रेडणी (३३.३२), रेडणी (३५.७८), शेळगाव (३४.४७), ननवरेवस्ती (४०.१२),

शेटफळ गढे (३५.३८), कळस (४७.९३), कळस (४५.९४), पोंधवडी (४७.६७), व्याहळी (३९.३५), कळस (५२.४६), पिंपळे (४८.३६), पोंधवडी (४७.९९), बिजवडी (३९.७२), बोरी (४८.४९), गागरगाव (९.४७), गोखळी (३१.३८), निरगुडे (३८.७५), सरडेवाडी ( ३६.२८), सरडेवाडी (३४.३१), वडापुरी (४७.४४), रूई, (४३.६३), अंथुर्णे (४९.४६), अंथुर्णे (४८.३६).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT