Water Bunds : सातारा जिल्ह्यात आठवडाभरात दोन हजार बंधारे

Bunds Update : जिल्ह्यात विविध सामाजिक संघटना, संस्था, शासकीय कार्यालये, शाळा व विद्यालये यांच्या मदतीने जलक्रांतीसाठी उठाव सुरू झाला आहे. गेल्या आठवडाभरात जिल्ह्यात सुमारे एक हजार ९३९ बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत.
Water Bunds
Water BundsAgrowon
Published on
Updated on

Satara News : या वर्षी कमी पाऊस झाल्याने अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी केलेल्या आवाहनानंतर जिल्ह्यात विविध सामाजिक संघटना, संस्था, शासकीय कार्यालये, शाळा व विद्यालये यांच्या मदतीने जलक्रांतीसाठी उठाव सुरू झाला आहे. गेल्या आठवडाभरात जिल्ह्यात सुमारे एक हजार ९३९ बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत.

पाऊस न झाल्याने खरीप हंगाम वाया गेला आहे. शासनाने जाहीर केलल्या दुष्काळाच्या सातारा जिल्ह्यातील बहुतांशी मंडलांचा समावेश झाला आहे. पुढील काळात दुष्काळाच्या झळा तीव्र होणार आहे.

Water Bunds
Water Bund : रत्नागिरीत नदी, नाल्यांवर १२०० हून अधिक बंधारे

हा दुष्काळ परिस्थिती कमी करण्यासाठी जिल्ह्यात विविध सामाजिक संघटना, संस्था, शासकीय कार्यालये, शाळा व विद्यालये बंधारे बांधण्यासाठी प्रशासनाकडून केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत एक दिवस बंधारे कामासाठी ओढे, नाले, नद्यांच्या परिसरात गेल्या आठवडाभरात वनराई बंधाऱ्यांची कामे करण्यात आली.

वनराई बंधारे बांधल्यामुळे सध्या होत असलेल्या पावसाने या ओढ्या व नाल्यांना पाणी येऊन वनराई बंधाऱ्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पाणी अडले जाईल, तसेच पाणीसाठा होऊन भूजल पातळीत वाढ होणार आहे, तसेच बंधाऱ्याच्या परिसरात असणाऱ्या विहिरी, कूपनलिकेच्या पाणी पातळीतही वाढ होण्यास मदत होणार आहे.

Water Bunds
Wanrai Bunds : अमरावती विभागात पूर्णत्वास आले २९०४ वनराई बंधारे

तालुकानिहाय बंधाऱ्यांची संख्या

सातारा : १०२, कऱ्हाड : १८०, पाटण : ५२५, माण : ९७, फलटण : १५७, खंडाळा : ४०, वाई : २२७, जावळी : १९७, महाबळेश्वर : १५८, कोरेगाव : १०८, खटाव : १४८, असे एकूण १०३९ बांधण्यात आले आहेत.

एक दिवस वनराई बंधारे उपक्रमासाठी हा उपक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्यात आला आहे. शासकीय, निमशासकीय, शाळा, विद्यालये, सामाजिक संघटना, संस्थांसह लोकांचा सहभाग मिळत आहे. या बंधाऱ्यांमुळे भूजल पातळीत वाढ होणार आहे.
विजय माईणकर, जिल्हा कृषी विकास अधिकारी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com