Foreign tour of farmers Agrowon
ॲग्रो विशेष

Foreign tour of farmers : राज्यातील १२० शेतकऱ्यांना दीड कोटींचा निधी?

farmers foreign tour : आपल्या देशात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. तशीच ती इतर देशातही केली जाते. अनेक देशांमध्ये ती विकसित आणि आधुनिक तत्रांच्या जोरावर केली जाते. हे तंत्र आपल्याही राज्यातील शेतकऱ्यांना मिळावे यासाठी राज्य शासनाकडून मोठी निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी दीड कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : आपला भारत देश हा कृषी प्रधान देश असून येथे ७० टक्क्यांहून अधिक लोक आज शेती करतात. आपल्या राज्यातही अनेक लोक याच शेतीवर अवलंबून आहेत. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना फटका बसत आहे. त्यावर आता राज्य सरकारकडून उपाय योजना आखल्या जात आहेत. यातंर्गत विकसित देशातील आधुनिक शेतीचा अभ्यास करता यावा यासाठी, राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे ही योजना आखण्यात आली आहे. याबाबत कृषी, पशूसंवर्धन, दुग्धव्यवसाय विभाग आणि मत्स्य व्यवसाय विभागाने शुक्रवारी (ता.१२ रोजी) शासन निर्णय जारी केला असून १२० शेतकरी हे परदेश दौऱ्यावर जाणार आहेत.

आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना विकसित देशातील आधुनिक शेतीचा अभ्यास करता यावा म्हणून राज्य शासनाने असे अभ्यास दौरे आखत असते. २००४ पासून ही योजना राज्यभरात राबवली जाते. कोरोना संकटामुळे हे दौरे बंद होते. पण आता पुन्हा एकदा हे दौरे सुरू होत आहेत. २०२३- २४ या आर्थिक वर्षाकरिता सरकारने २ कोटींचे अनुदानातून ७० टक्के खर्चाला मान्यता देताना दीड कोटींचा निधी मंजूर केला आहे.

यातंर्गत विविध प्रगत देशांतील शेतमालाची निर्यात, कृषी मालाचे पणन, बाजारपेठेतील मागणी, कृषी माल प्रक्रिया यांचा अभ्यास करता येणार आहे. तसेच त्यांना या दौऱ्यात शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या अद्यावत तंत्रज्ञानाची माहिती देखील मिळणार आहे.

१२० शेतकरी आणि ६ अधिकारी

राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे या योजनेतून यंदा राज्यातील १२० शेतकरी आणि ६ अधिकारी यांची निवडण करण्यात येणार आहे. जे परदेश दौऱ्यावर जातील. या १२६ जणांसाठी सरकारने १ कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याचे कृषी विभागाच्या आयुक्तांनी सांगितले आहे. तसेच याबाबत शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार योजनेची अंमलबजावणी केली जाईल असेही त्यांनी म्हटलं आहे.

•कागदपत्रे आणि कोणत्या अटी•

१) शेतकऱ्याचा सातबारा, आठ-अ उतारा

२) परदेश दौऱ्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्याचे वय हे २१ ते ६२ दरम्यान असावे.

३) संबंधित शेतकरी सरकारी कर्मचारी किंवा निमशासकीय संस्थांमध्ये नोकरी करणारा नसावा.

•कागदपत्रे आणि कोणत्या अटी•

४) यापूर्वी संबंधीत शेतकऱ्याने सरकारच्या माध्यमातून परदेश दौरा केलेला नसावा

५) वैद्यकीय प्रमाणपत्र

६) संबंधित शेतकऱ्याकडे पासपोर्ट असावा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Result 2024 : विधानसभा निवडणूक निकालानंतर काय म्हणतायत राजकीय नेते?

Mahayuti Sarkar Formation Formula : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला?; अजित पवारांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड

Congress On Mahayuti : लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफीसह जनतेला दिलेल्या आश्वासनांची भाजप महायुतीने पुर्तता करावी; काँग्रेसची मागणी

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेते पदी अजित पवार 'पुन्हा' ; आमदारांच्या बैठकीत निवड

Soybean Productivity : शासकीय खरेदीसाठी सोयाबीनची उत्पादकता जाहीर

SCROLL FOR NEXT