POCRA Agrowon
ॲग्रो विशेष

POCRA 2.0 : ‘पोकरा’अंतर्गत सूक्ष्म नियोजन प्रक्रिया १५ मेपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन

Agriculture Project : सध्या लोकसहभागातून तयार करण्याची सूक्ष्म नियोजन प्रक्रिया १५ मेपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

Team Agrowon

Hingoli News : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा २.० मध्ये हिंगोली जिल्ह्यातील १४८ गावांची निवड झाली आहे. सध्या लोकसहभागातून तयार करण्याची सूक्ष्म नियोजन प्रक्रिया १५ मेपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. जिल्ह्याच्या चौफेर प्रगतीसाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करूया, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष साह्य मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले.

संत नामदेव कवायत मैदानावर पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. या वेळी आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव, आमदार तानाजी मुटकुळे, माजी आमदार रामराव वडकुते, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, अपर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, अपर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपजिल्हाधिकारी मंजूषा मुथा, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, गणेश वाघ, केशव गड्डापोड यांची उपस्थिती होती.

झिरवाळ म्हणाले, की जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ८६ हजारांवर शेतकऱ्यांनी शेतकरी ओळख क्रमांक तयार केले असून, उर्वरित शेतकऱ्यांचे आयडी तयार करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत ठिबक सिंचन व तुषार सिंचन संचासाठी महाडीबीटी पोर्टलद्वारे ४ हजार २१७ लाभार्थ्यांना ७ कोटी ७१ लाख ७१ हजार रुपयाचे अनुदान अदा करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत १९८ उद्योगांना १२ कोटी ४५ लाख रुपये बँकाद्वारे कर्ज मंजूर करण्यात आले. जिल्ह्यात हळद उत्पादक शेतकरी, कंपन्या आणि हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून तज्ञांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नामुळे वसमत हळद या नावाने हिंगोलीच्या हळदीला भौगोलिक मानांकनांचा दर्जा प्राप्त झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavistar Ai App: ‘कृषी’कडून शेतकऱ्यांसाठी ‘महाविस्तार एआय’ ॲप

California Import Ban: कॅलिफोर्नियातून आलेले कंटेनर पाठवले परत

Crop Loan: कर्जदार ९४ हजार शेतकऱ्यांना परतफेडीची चिंता

Farmer Protest: ‘शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या’

Sugar Commissioner: राज्याच्या साखर आयुक्तपदी डॉ. संजय कोलते यांची नियुक्ती

SCROLL FOR NEXT