Aqueduct  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Supply Scheme : समांतर जलवाहिनीचा शिल्लक १४५ कोटी निधी त्वरित अदा होणार

Water Scheme : उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीच्या योजनेतील एकूण २५० कोटी रुपयांपैकी १४५ कोटी रुपये हे प्रलंबित होते.

Team Agrowon

Solapur News : उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीच्या योजनेतील एकूण २५० कोटी रुपयांपैकी १४५ कोटी रुपये हे प्रलंबित होते. तरी प्रलंबित असलेला १४५ कोटी रुपयांचा निधी अदा करण्याबाबत खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामी यांनी एनटीपीसी प्रकल्पात याबाबत संयुक्त बैठक घेतली.

या बैठकीत खासदार महास्वामी यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे डिसेंबरअखेर १०० ते जानेवारी महिन्यात ४५ कोटी रुपयांचा निधी संबंधित विभागाकडे अदा करण्याचे एनटीपीसीने मान्य केले.

सोलापूरच्या पाणीपुरवठ्यासाठी दुहेरी समांतर जलवाहिनीच्या माध्यमातून एनटीपीसी आणि सोलापूर महापालिका यांच्यात २७ ऑक्टोबर २०१६ रोजी सामंजस्य करार झाला होता. या प्रकल्पासाठी एनटीपीसीने २५० कोटी रुपये देण्याबाबत झालेल्या करारांपैकी १४५ कोटी प्रलंबित असल्याने या योजनेस विलंब होत असल्याचे लक्षात घेऊन खासदार डॉ. महास्वामी यांनी एनटीपीसी येथे संयुक्त बैठक घेत याबाबत आवश्यक त्या सूचना केल्या.

समांतर जलवाहिनी योजना कार्य प्रगतिपथावर असून, प्रलंबित १०० कोटी रुपये डिसेंबरअखेर उर्वरित ४५ कोटी रुपये जानेवारीमध्ये अदा करण्याच्या सूचना केल्या. त्यास एनटीपीसीचे महाप्रबंधक तपन बंदोपाध्याय यांनी सकारात्मकता दर्शवीत डिसेंबरअखेर हा प्रलंबित निधी अदा करण्याचे सांगितले.

त्यामुळे ही योजना विना अडथळा लवकरच मार्गी लागणार आहे, असे खासदार महास्वामी म्हणाले. या वेळी एनटीपीसीचे महाप्रबंधक तपन बंदोपाध्याय, सोलापूर लोकसभा प्रभारी विक्रम देशमुख, स्मार्ट सिटी कंपनीचे लेखाधिकारी मनीष कुलकर्णी, एनटीपीसीच्या विभाग प्रमुख अनुराधा अन्य अधिकारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MahaDBT : ‘महाडीबीटी’ पोर्टलवर कागदपत्रे अपलोडसह अनेक अडचणी

Book Review: ध्यासपंथी वाटचालींचा कोलाज

Rural Development: शेतकरी, ग्रामीण विकास आणि पर्यावरणाचा एकत्र विचार व्हावा

Global Economy: आली लहर, केला कहर

Maharashtra Farming: शेतकरी : वर्णव्यवस्थेतला तळाचा घटक

SCROLL FOR NEXT