Chandrbhaga River : चंद्रभागा व्हावी स्वच्छ जलवाहिनी

River Conservation : चंद्रभागा नदी ही स्वच्छ आणि अखंड वाहणारी जलवाहिनी होणे आवश्यक आहे. आपल्या प्राचीन ग्रंथामध्ये चंद्रभागा स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व सांगितले आहे.
River Conservation
River ConservationAgrowon
Published on
Updated on

Solapur News : चंद्रभागा नदी ही स्वच्छ आणि अखंड वाहणारी जलवाहिनी होणे आवश्यक आहे. आपल्या प्राचीन ग्रंथामध्ये चंद्रभागा स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व सांगितले आहे. तथापि, नदीत पाणी नसेल तर भाविक वारकरी स्नानापासून वंचित राहतील.

अप्पर भीमा क्षेत्रातील पुणे व पिंपरी चिंचवडसह भीमा किनाऱ्यावरील विविध गावांचे सांडपाणी नदीपात्रात मिसळते, ते उजनी धरणात येऊन साचते. धरणातील पाणी सोलापूर आणि अन्य पाणी पुरवठा योजनांसाठी सोडल्यानंतर ती घाण खाली वाहत येते. धरणापुढील म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा-माढा तालुक्यातील गावांना त्याचा मोठा फटका बसतो. रोगराई वाढते, या सगळ्याची अनेकदा चर्चा करून झाली आहे.

River Conservation
River Conservation : नद्या वाचविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ आवश्यक

निम्न भीमा क्षेत्रात म्हणजे पंढरपूर आणि परिसरातील नदीपात्रात साखर कारखान्यांसह एमआयडीसीमधील विविध कारखान्यांमधील रासायनिक सांडपाणी प्रक्रिया न करता सोडले जात असल्याचे वेळोवेळी उजागर झाले आहे. तात्पुरता कारवाईचा बडगा उचलला जातो, पुन्हा परिस्थिती जैसे थे होते. त्यामुळे ही समस्या सोडवण्यासाठी सातत्यपूर्ण कामगिरी व्हायला हवी, असे सोलापूर जिल्हावासियांचे म्हणणे आहे. ते गांभीर्याने घ्यायला हवे, इतकेच.

River Conservation
River Conservation : ‘चला जाणूया नदीला’तील कामांचा अहवाल तयार करा

उद्धव घाटाची नियमित देखभाल हवी ः

महादजी शिंदे यांचे सहकारी गोपाळ नाईक तांबवेकर यांनी १७८० च्या सुमारास चंद्रभागेवरील उद्धव घाट बांधला असावा. त्याला २७ पायऱ्या आहेत. श्रीविठ्ठल मिरवणुकीच्या मार्गावर असल्याने त्याला महत्त्व आहे. घाट परिसरात श्री द्वारकेश्वर, श्री पुंडलिक आणि श्री गजाननाची मंदिरे आहेत. ती सुमारे शंभर वर्षांपूर्वीची असावीत. रुक्मिणी देवीचे प्रमुख उपासक असलेल्या उत्पात समाजात या घाटावरून श्रीगणेश व गौरी विसर्जन करतात.

पंढरपूर शहरातून वाहून येणारे पावसाचे पाणी या घाटाजवळ साचते. त्यामुळे नगरपालिकेने या घाटाच्या तीन पायऱ्या वाढवल्या आहेत. त्यामुळे जमिनीपासून थोडी उंची लाभली आहे. या घाटाविषयी अनेकांना नेमकी माहिती नाही.

वास्तविक चंद्रभागेवरील सर्वच घाटांवर त्याचे नाव आणि त्याचा इतिहास सांगणारा फलक असावा. घाट परिसराचे पुरातन महत्त्व जाणून त्याची सातत्याने देखभाल करणे आवश्यक आहे. घाट परिसर स्वच्छ राहण्याच्या दृष्टीने साफसफाई करणेदेखील आवश्यक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com