Cotton, Soybean Market  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Scheme Corruption : कापूस, सोयाबीन योजनेत १४१ कोटींचा भ्रष्टाचार

Team Agrowon

Pune News : महाराष्ट्र कृषिउद्योग विकास महामंडळ व कृषी मंत्री कार्यालयामध्ये झालेल्या पत्रव्यवहारातून राज्यातील कापूस व सोयाबीन मूल्यसाखळी योजनेत शेतकऱ्यांच्या नावाखाली १४१ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे या योजनेला तत्काळ स्थगिती द्यावी, अशी मागणी कॉंग्रेस पक्षाने थेट राज्यपालांकडे केली आहे.

या गैरव्यवहाराबाबत राज्यपाल, मुख्य सचिव, सक्तवसुली संचालनालय, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व लोकायुक्तांकडे २० जून रोजी कॉंग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी पुराव्यांसह तक्रार दाखल केली आहे. ‘‘या संपूर्ण योजनेचे त्वरित प्रशासकीय लेखापरीक्षण करावे.

त्यानंतर यात जबाबदार असलेल्या मंत्र्यासह कृषी आयुक्तालय, मंत्रालय व कृषिउद्योग महामंडळातील दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. या गैरव्यवहारात स्वतः मंत्री दर्जाची व्यक्ती गुरफटली असल्यामुळे राज्याचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला चौकशीत मर्यादा येतील. त्यामुळे ही चौकशी सीबीआय किंवा ईडीमार्फत करावी,’’ अशी मागणी करण्यात आली आहे.

योजनेतून पैसा लाटण्यासाठी मंत्रालयातून हालचाली झाल्या. त्यासाठी उपसचिव संतोष कराड यांनी कृषी आयुक्तांशी केलेला पत्रव्यवहार गंभीर स्वरूपाचा आहे. योजनेतील गैरव्यवहाराला तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव अनूप कुमार व कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांचा विरोध होता. त्यामुळे दोघांनाही कृषी खात्यातून बदली करून जाण्यास भाग पाडले गेले.

या गैरव्यवहाराला कृषी मंत्र्यांच्या कार्यालयातील एक खासगी सचिव, कृषी आयुक्तालयाचा एक माजी संचालक, एक विद्यमान सहसंचालक, कृषिउद्योग महामंडळांतील एक महाव्यवस्थापक पूर्णतः जबाबदार आहेत. या अधिकाऱ्यांनी पद्धतशीरपणे संगनमत करीत कंत्राटदारांना सोयीची ठरणारी योजना तयार केली. त्यासाठी सोयीचे नियम बनवले. अडचणीचे ठरणारे नियम रद्द करण्यासाठी शासनाकडून मान्यता आणली. निविदांमध्येदेखील हेराफेरी केली, असा गंभीर आरोप श्री. मुंडे यांनी केला आहे.

अशा आहेत बाबनिहाय गैरव्यवहाराच्या रकमा (रुपयांत)

कपाशीसाठी नॅनो डीएपी -तीन कोटी ४५ लाख

कपाशीसाठी नॅनो युरिया - १२ कोटी ९३ लाख ७५ हजार

डिजिटल सेन्सर- ८ लाख ६१ हजार ४००

कापूस साठवण गोण्या - ५२ कोटी ५३ लाख २७ हजार २००

सोयाबीनसाठी नॅनो डीएपी - २३ कोटी २४ लाख ५० हजार

सोयाबीनसाठी नॅनो युरिया - ८ कोटी ७१ लाख ५० हजार रुपये

मेटाल्डीहाईड कीटकनाशक - १३ कोटी १५ लाख

फवारणी पंप - २६ कोटी ९९ लाख ६८ हजार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean MSP Procurement : हमीभावाने १३ लाख टन सोयाबीनची खरेदी होणार 

Sugarcane Season : महाराष्ट्र आणि कर्नाटकचा ऊस गाळप हंगाम एकावेळी, उसाची पळवापळवी थांबणार!

Ration Grain : ई-केवायसी नसल्यास एक नोव्हेंबरपासून रेशन बंद

Kolhapur market committee : कोल्हापूरच्या बाजार समितीत डुक्कर आणि चोरांनी केलं बेजार, आळा घालण्याची मागणी

Cold Storage Facility : जतला शीतगृह, अन्यत्र पायाभूत सुविधा देणार

SCROLL FOR NEXT