Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : अमरावती जिल्ह्यातील १४ हजारांवर शेतकरी अपात्र

Ineligible Crop Insurance : नियमित पीककर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याची योजना राज्य सरकारने गुंडाळली आहे.

Team Agrowon

Amravati News : नियमित पीककर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याची योजना राज्य सरकारने गुंडाळली आहे. जिल्ह्यातील १४ हजारांवर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्यापासून विविध कारणांखाली अपात्र ठरवून वंचित ठेवण्यात आले आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली होती. त्याचवेळी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र लाभ मिळणार नव्हता. तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने अशा शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याची योजना लागू करण्यात आली.

या योजनेंतर्गत आतापर्यंत १७ हजार ८०१ शेतकऱ्यांना सुमारे ८१ कोटी ११ लाखांचे वाटप करण्यात आले आहे. परंतु यातून प्रतीक्षेत असलेल्या सुमारे १४ हजार शेतकऱ्यांना विविध कारणांमुळे अपात्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील १ लाख २० हजार थकबाकीदार शेतकऱ्यांना ८५७ कोटींची कर्जमाफी देण्यात आलेली आहे. याशिवाय नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी २०१७ ते २०१९ या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन वर्षांत कर्जाची उचल करून नियमितपणे पूर्ण परतफेड केलेल्या असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

तीन वर्षांपैकी दोन वर्षे जरी कर्ज नियमितपणे परतफेड केलेले असेल अशा शेतकऱ्यांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. तसेच एखादा शेतकरी मृत झाल्यानंतर त्याच्या असलेल्या वारसांनी कर्ज परतफेड केली असल्यास त्या वारसदारालाही या योजनेचा लाभ आता घेता येणार आहे.

या योजनेसाठी जिल्ह्यातील ३२ हजार ६३३ शेतकरी पात्र होते. यापैकी १८ हजार ९२५ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले आहे. यापैकी १७ हजार ८०१ खातेदारांना प्रत्येकी ५० हजार, याप्रमाणे ८१ कोटी ११ लाख रुपयांचा लाभ मिळालेला आहे. अद्यापही जिल्ह्यातील १४ हजारांवर शेतकरी लाभाच्या प्रतीक्षेत असताना त्यांची नावे निकषात अपात्र असल्याचे सहकार विभागाने सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT