Babasaheb Pisore and Rajendra Supekar Agrowon
ॲग्रो विशेष

Krushibhushan Award : नगरमधील १४ शेतकऱ्यांचा कृषिभूषण पुरस्काराने होणार सन्मान

Agriculture Award : कांद्यावर संशोधन करणारे कृषिभूषण बाबासाहेब पिसोरे यांना कृषिरत्न, तर जामखेडचे तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषिसेवारत्न पुरस्कार जाहीर झाला.

Team Agrowon

Nagar News : नगर जिल्ह्यातील १४ जणांना मान मिळाला आहे. कांद्यावर संशोधन करणारे कृषिभूषण बाबासाहेब पिसोरे यांना कृषिरत्न, तर जामखेडचे तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, बेलपिंपळगाव (ता. नेवासा) येथील कृषी सहाय्यक नीलेश बिबवे यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषिसेवारत्न पुरस्कार जाहीर झाला.

कृषी क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पुरस्काराची घोषणा नुकतीच झाली. त्यात नगर जिल्ह्याने मानाचे स्थान मिळवले आहे. कृषिभूषण बाबासाहेब पिसोरे यांना २०२१ चा डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार जाहीर झाला.

कोतुळ (ता. अकोले) येथील सयाजीराव पोखरकर यांना वसंतराव नाईक कृषिभूषण, नेवासा तालुक्यातील भेंडा येथील पुष्पा अर्जुन नवले यांना जिजामाता कृषिभूषण, तर याच तालुक्यातील पाचेगाव (कारवाडी) येथील मोहन गंगाधर तुंवर यांना सेंद्रिय शेतीमधील कृषिभूषण मिळाला आहे.

कोपरगाव तालुक्यातील नाटेगावचे राहिवासी व नाशिकमधील ‘अॅग्रोवन’चे पत्रकार मुकुंद पिंगळे, संगमनेर येथील प्रशांत नाईकवाडी, राहुरी येथील पत्रकार शिवाजी घाडगे यांना वसंतराव नाईक शेतिमित्र, संगमनेर तालुक्यातील निमज येथील प्रगतिशील शेतकरी तुकाराम गुंजाळ, भोसे (ता. पाथर्डी) येथील डॉ. शशिकांत भरत शिंदे, केलवड (ता. राहाता) येथील बाळासाहेब सुधाकर गमे यांना वसंतराव नाईक शेतिनिष्ठ शेतकरी पुरस्कार मिळाला आहे.

धामनगाव (ता. अकोले) येथील शांताराम बारामते यांना आदिवासी गटातील वसंतराव नाईक शेतिनिष्ठ शेतकरी पुरस्कार मिळाला. जामखेडचे तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, बेलपिंपळगाव (ता. नेवासा) येथील कृषी साहाय्यक नीलेश बिबवे यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार जाहीर झाला. पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळचे बाळासाहेब कारखिले यांना उद्यान पंडित पुरस्कार जाहीर झाला .

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT