Agriculture Award : नांदेडमधील पाच शेतकऱ्यांना शासनाचे पुरस्कार

Agriculture News : राज्य शासनाच्या कृषी विभागाने २०२०, २०२१ व २०२२ या तीन वर्षाचे विविध कृषी पुरस्काराची घोषणा केली आहे.
Agriculture
Agriculture Agrowon
Published on
Updated on

Nanded News : राज्य शासनाच्या कृषी विभागाने २०२०, २०२१ व २०२२ या तीन वर्षाचे विविध कृषी पुरस्काराची घोषणा केली आहे. यात नांदेडमधील एका युवा शेतकऱ्यांसह आदिवासी महिला शेतकरी व इतर तीन शेतीनिष्ठ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

राज्यात कृषी, कृषी संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्‍या व्यक्ती, संस्था यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार, जिजामाता कृषिभूषण पुरस्कार, उद्यान पंडित पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार, कृषी भूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार (आदिवासी गट व सर्वसाधारण गट), पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्काराचा समावेश आहे.

Agriculture
Agriculture Award : सेवारत्न पुरस्कारात आता मंत्रालय वाटेकरी

यात नांदेड जिल्ह्यातील पाच शेतकऱ्यांना पुरस्कार मिळाले आहे. यात सायाळ (ता. लोहा) प्रयोगशील युवा शेतकरी रत्नाकर गंगाधर ढगे यांना युवा शेतकरी पुरस्कार २०२१ जाहीर झाला आहे. तर कासराळी (ता. बिलोली) येथील प्रयोगशील शेतकरी बसवंत शंकरराव कासराळीकर यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार २०२१ साठी (सर्वसाधारण गट) निवड झाली आहे.

Agriculture
Agriculture Award : कृषी पुरस्कारांच्या रकमांमध्ये भरीव वाढ

कनकवाडी (ता. किनवट) येथील सुबोध महादेव व्यवहारे यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार २०२१ (आदिवासी गट), आंबेगाव (ता. अर्धापूर) येथील शिवराज फुलाजी मुदखेडे यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार २०२२ (सर्वसाधारण गट) जाहीर झाला आहे.

तर किनवट तालुक्यातील कोल्हारी येथील अंजनाबाई दिगंबर आंकूरवाड यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार २०२२ (आदिवासी गट) जाहीर झाला आहे. पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, कृषिमंत्री यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com