POCRA Agrowon
ॲग्रो विशेष

POCRA Scheme : ‘पोकरा’अंतर्गत १३८ कोटींवर अनुदान थेट बँक खात्यावर जमा

POCRA Subsidy : पोकराअंतर्गत एकूण ३ टप्प्यांत परभणी जिल्ह्यातील ९ तालुक्यांतील २५६ ग्रामपंचायतीअंतर्गत २७५ गावांची निवड झालेली आहे.

Team Agrowon

Parbhani News : परभणी जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (हवामानाकुल कृषी प्रकल्प ः पोकरा) अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या विविध घटकांसाठी सोमवार (ता. १२) अखेरपर्यंत ४० हजार ५२२ लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट लाभ हस्तांतर प्रणालीद्वारे (डीबीटी) बँक खात्यावर १३८ कोटी २२ लाख रुपये एवढे अनुदान जमा करण्यात आले. अजून २२३ शेतकऱ्यांचे ८२ लाख रुपये अनुदान प्रलंबित आहे.

पोकराअंतर्गत एकूण ३ टप्प्यांत परभणी जिल्ह्यातील ९ तालुक्यांतील २५६ ग्रामपंचायतीअंतर्गत २७५ गावांची निवड झालेली आहे. या गावांतील ६६ हजार २६७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी ६३ हजार ७१२ शेतकऱ्यांची पडताळणी झाली.

या शेतकऱ्यांनी तुती लागवड, तुषार सिंचन संच, ठिबक सिंचन, शेततळे, शेडनेटगृह, हरितगृह, मत्स्यपालन, आदी वैयक्तिक घटकांच्या लाभासाठी १ लाख ९१ हजार ८७३ अर्ज केलेले आहेत.

कृषी सहायक (डेस्क क्रमांक १) स्तरावर मंजुरीसाठी ३ हजार ६६४ अर्ज, तर कृषी सहायक स्तरावर (डेस्क २) स्थळ पाहणीसाठी ९ हजार ३१२ अर्ज प्रलंबित आहेत. पूर्वसंमतीसाठी तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी स्तरावर १ हजार ३०५ अर्ज प्रलंबित आहेत.

शेतकरी स्तरावर कामे करून बिल अपलोड करायचे शिल्लक १७ अर्ज, मोका तपासणीसाठी ८२७ अर्ज, उपविभागीय कृषी अधिकारी लेखाधिकारी स्तरावरील ५३ अर्ज, तर अंतिम मंजुरीसाठी डेस्क ६ वर १३ अर्ज प्रलंबित होते. अनुदानासाठी आवश्यक त्या पडताळणीनंतर सोमवार (ता. १२)पर्यंत थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणालीद्वारे ३७ हजार ६७५ शेतकऱ्यांच्या खात्यावर १२२ कोटी ४१ लाख रुपये अनुदान जमा करण्यात आले.

जलसंधारणाच्या कामांवर २ कोटी ३८ लाख रुपये खर्च

पोकराअंतर्गंत जिल्ह्यात कृषी विभागाच्या उपविभागामध्ये जलसंधारणाची १ हजार १४६ कामे प्रस्तावित आहेत. ई-निविदा पूर्ण झालेल्या २५९ कामांपैकी २४१ कामांना कार्यारंभ आदेश दिले आहेत.

त्यापैकी आजवर १६६ कामे पूर्ण झाली आहेत. त्यावर २ कोटी ३८ लाख ९९ हजार रुपये खर्च झाला आहे. अजून १ कामांचे १९३ हजार ७०० रुपये अनुदान प्रलंबित आहे, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पोकराअंतर्गत वैयक्तिक लाभ घटकनिहाय

लाभार्थी संख्या, अनुदान रक्कम (कोटींत)

घटक लाभार्थी संख्या अनुदान रक्कम

तुषार संच २११८७ ३८.९३

ठिबक संच ५३८८ ४०.४९

फळबाग लागवड ३३६१ १२.३०

बीजोत्पादन ५९१७ ६.५७

शेडनेट हाउस १५१ १६.४८

पॉलीहाऊस २३ २.९४

कृषी यांत्रिकीकरण ५९९ ४.२४

वैयक्तिक शेततळी १९६ ४.२६

विहिरी ३३७ ६.५०

पाइप्स १५९३ ३.१२

वॉटरपंप ७२४ ०.९८

रेशीम शेती ६७ ०.४०

शेडनेट साहित्य २८ ०.३१

कंपोस्ट खत युनिट ८६ ०.०५८

शेततळे अस्तरीकरण १२ ०.१०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT