PDCC Bank
PDCC Bank Agrowon
ॲग्रो विशेष

PDCC Bank Crop Loan : पुणे जिल्हा बँकेकडून एकाच महिन्यातच १३०० कोटींचे पीककर्ज

Team Agrowon

Zilha Bank Update : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने (पीडीसीसी) चालू वर्षीच्या खरीप हंगामासाठी एकाच महिन्यात १ हजार ३०१ कोटी १४ लाख ५४ हजार रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे. जिल्ह्यातील कर्जवाटपाचे हे प्रमाण एकूण उद्दिष्टाच्या ६८.८४ टक्के इतके पूर्ण झाले आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील १ लाख ४२ हजार २७७ शेतकऱ्यांना पीक कर्जाचा लाभ मिळाला आहे. दरम्यान, खरीप हंगामातील पिकांसाठी शेतकऱ्यांना येत्या ३० सप्टेंबरपर्यंत पीककर्ज घेता येणार आहे. आगामी खरीप हंगामासाठी १ एप्रिल २०२३ पासूनच पीककर्ज वाटप सुरू केल्याचे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी सोमवारी (ता. ८) सांगितले.

पुणे जिल्हा बॅंकेच्या वतीने मागील पंधरा वर्षांपासून शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज शून्य टक्के व्याजाने वितरित केले जात आहे. त्यानंतर सातारा जिल्हा बॅंकेनेही पुणे जिल्हा बॅंकेच्या पावलावर पाऊल ठेवत, हाच उपक्रम मागील दहा वर्षांपासून सुरू केला आहे.

पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांत शून्य टक्के व्याजाचा हा प्रयोग यशस्वी झाल्याचे पाहून राज्य सरकारने राज्यभर कर्ज वाटपाचा हा ‘पॅटर्न’ सुरू केला होता. परंतु, दोन वर्षांपूर्वी केंद्र सरकारने या पीक कर्जासाठीची दोन टक्के व्याज सवलत कमी केला. त्यामुळे मध्यंतरी याबाबत पेच निर्माण झाला होता.

परिणामी शून्य टक्के व्याजाची ही योजनाच बंद पडण्याच्या मार्गावर आली होती. परंतु, राज्य सरकारने अर्धा टक्के व्याजाचा फरकाचा भार राज्य बॅँकेने उचलावा, अशी सूचना राज्य बॅँकेला केली होती.

परंतु राज्य बॅँकेने काही अटी घातल्याने सरकारची ही सूचना बारगळली होती. मात्र, अर्धा टक्के व्याजाच्या फरकाचा भार जिल्हा बॅँकच उचलणार आहे. त्यामुळे यापुढेही शून्य टक्के व्याजाची सवलत चालू राहणार आहे.

मागेल त्याला लाभ

जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांसाठी जिल्हा बॅंकेने यंदा १ हजार ८९० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यानुसार जिल्ह्यातील मागेल त्या पात्र शेतकऱ्यांना या पीककर्जाचा लाभ दिला जाणार आहे. शिवाय यावर्षीही तीन लाख रुपयांपर्यंतच्या पीककर्जासाठी शून्य टक्के व्याजाची योजना सुरू ठेवण्यात आली आहे.

जिल्ह्यातील खरीप पीककर्ज दृष्टिक्षेपात

१ हजार ९०० कोटी रुपये

खरिपासाठी पीककर्ज वाटपाचे एकूण उद्दिष्ट

१ हजार ३०१ कोटी १४ लाख ५४ हजार रुपये

आतापर्यंत प्रत्यक्षात पूर्ण झालेले वाटप

१ लाख ४२ हजार २७७

पीककर्जाचा लाभ घेतलेले एकूण शेतकरी

१ लाख १९ हजार ९९५ हेक्टर

पीककर्जाचा लाभ झालेले क्षेत्र

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT