Cotton Seed Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Seed : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कपाशी बियाण्याची १३ लाख पाकिटे उपलब्ध

Cotton Seed Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कपाशीचे पीक सर्वात महत्त्वाचे आहे. या पिकाच्या बियाण्याची १३ लाख पाकिटे विक्रेत्यांकडे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कपाशीचे पीक सर्वात महत्त्वाचे आहे. या पिकाच्या बियाण्याची १३ लाख पाकिटे विक्रेत्यांकडे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

उर्वरित अपेक्षित बियाणे पाकिटे उपलब्ध करून घेण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील यांनी दिली.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येत्या खरीप हंगामासाठी ६ लाख ७५ हजार हेक्टर सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ६ लाख ७८ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामातील विविध पिकांची पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे.

प्रस्तावित करण्यात आलेल्या पीक पेरणीमध्ये कपाशीचे क्षेत्र सर्वाधिक ३ लाख ८२ हजार हेक्टर राहण्याचा अंदाज असून मका व बाजरी या पिकाचे अनुक्रमे १ लाख ७४ हजार हेक्टर व २२ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी अपेक्षित आहे. जिल्ह्यात बियाण्याचा सरासरी वापर ३४ हजार ४८२ इतका आहे.

येत्या खरीप हंगामासाठी ३९ हजार १०३ क्विंटल बियाण्याची मागणी आहे. १९ लाख कपाशी बियाणे पाकीट मागणी आहे. कृषी विभागाकडून २१ लाख कपाशी बियाणे पाकिटे उपलब्ध करून घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

त्यापैकी १३ लाख बियाणे पाकीट एक जून पासून विक्रेत्यांकडे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मका व इतर आवश्यक बियाण्यांचा कुठलाही तुटवडा नसल्याचे श्री. पाटील म्हणाले.

जिल्ह्यात खरीप हंगामात रासायनिक खतांचा सरासरी वापर २ लाख ७३ हजार ६२० टन आहे. येत्या खरीप हंगामासाठी ३ लाख ८ हजार ९६८ खताची मागणी नोंदविण्यात आली आहे. २ लाख ७३ हजार ६२० रासायनिक खतांचे आवंटन शासनाकडून प्राप्त झाले.

त्या तुलनेत प्रत्यक्षात १ लाख ६४ हजार ३६० टन विविध रासायनिक खत जिल्ह्यात उपलब्ध आहेत. त्यामध्ये युरिया ५१ हजार ४९७ टन, डीएपी १६ हजार ५१० टन , एमओपी १०८५ टन, एनपीके ६३ हजार ७२७ टन खताचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT