Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : अकोल्यातील शेतकऱ्यांसाठी १३ कोटींची मदत जाहीर

Heavy Rain Crop Loss : या खरीप हंगामात जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यांत झालेल्या अति पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते.

Team Agrowon

Akola News : या खरीप हंगामात जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यांत झालेल्या अति पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त दहा हजार ५०६ शेतकऱ्यांसाठी शासनाने १२ कोटी ९० लाख १७ हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. याबाबत शासनाचा आदेश निघाला आहे.

यंदाच्या खरीप हंगामात सुद्धा जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे ९५८८ हेक्टरवरील पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त क्षेत्राचे महसूल, ग्रामविकास व कृषी विभागामार्फत संयुक्त पंचनामे करून सर्वेक्षण करण्यात आले.

त्यानंतर मदतीची मागणी शासनाकडे करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने १२ कोटी ९० लाख १७ हजार रुपये मंजूर केले आहेत. त्याचा फायदा दहा हजार ५०६ शेतकऱ्यांना मिळेल.

या पिकांचे झाले नुकसान- कपाशी, सोयाबीन, तूर

नुकसानग्रस्त गाव संख्या १५२

शेतकरी संख्या १०५०६

क्षेत्र ९४७४.३७ हेक्टर

मंजूर निधी १२ कोटी ९० लाख ६४ हजार

तालुकानिहाय नुकसान

तालुका गावे शेतकरी

बार्शीटाकळी ५८ २३७०

अकोला ६८ ६६३३

मूर्तिजापूर ८ ४७१

पातुर १४ १००८

अकोट ४ २४

एकूण १५२ १०५०६

एकूण निधी : १२ कोटी ९० लाख ६४ हजार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parliament Winter Session 2024 : आज संसदेचे हिवाळी अधिवेशन; अदानी प्रकरण आणि वक्फ विधेयकामुळे तापमान वाढणार?

Onion Crop : आळेफाटा परिसरात कांदा पीक फुलोऱ्यात

Livestock Market : आळेफाटा येथे गाईंच्या बाजारात ५४ लाखांची उलाढाल

Climate Change Conference : विकसित राष्ट्रांना ३०० अब्ज डॉलर्स मिळणार

Cotton Market : वरोरा भागात कापसाला ७१५० रुपयांचा दर

SCROLL FOR NEXT