Kharif Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Sowing : परभणी १.२७ टक्के, तर हिंगोलीत २.६९ टक्के पेरणी

Cotton, Soybean, Tur Cultivation : पाऊस पडण्याच्या अपेक्षेने अनेक मंडळातील शेतकऱ्यांनी कपाशीच्या लागवडीवर भर दिला. काही सोयाबीन, तूर, मूग, उडदाची पेरणी केली.

Team Agrowon

Parbhani News : यंदाच्या (२०२३) खरीप हंगामात शुक्रवार (ता. ३०) पर्यंत परभणी जिल्ह्यात ६ हजार ८०२ हेक्टरवर(१.२७ टक्के ) व हिंगोली जिल्ह्यात ९ हजार ७२४ हेक्टरवर (२.६९ टक्के ) पेरणी झाली आहे. जून महिन्यात अंत्यत कमी पाऊस झाला आहे.

परिणामी जमिनीत पुरेसा ओलावा नसल्यामुळे खरीप पिकांच्या पेरण्या रखडल्या आहेत. पाऊस पडण्याच्या अपेक्षेने अनेक मंडळातील शेतकऱ्यांनी कपाशीच्या लागवडीवर भर दिला. काही सोयाबीन, तूर, मूग, उडदाची पेरणी केली. गेल्या तीन चार दिवसापासून पावसाने दडी मारल्यामुळे दुबार पेरणीचे सावट आहे.

परभणी जिल्ह्यात सर्वसाधारण ५ लाख ३९ हजार ९०० पैकी ६ हजार ८०२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यात तुरीची ४५ हजार ९५९ पैकी १५ हेक्टर, मुगाची २७ हजार १७८ पैकी १२ हेक्टर, उडदाची ९ हजार ८० पैकी कापसाची १ लाख ९२ हजार २१३ पैकी ६ हजार ७०४ हेक्टर (३.४९ टक्के) पेरणी झाली आहे.

परभणी तालुक्यात ६३८ हेक्टर,सेलू तालुक्यात १ हजार २८० हेक्टर, पाथरी तालुक्यात १ हजार ८६९ हेक्टर, गंगाखेड तालुक्यात १ हजार ६७२ हेक्टर, पालम तालुक्यात ७८५ हेक्टर, पूर्णा तालुक्यात ५५८ हेक्टर पेरणी झाली. जिंतूर, मानवत, सेलू या ३ तालुक्यात पेरणी झाल्याची नोंद नाही.

हिंगोली जिल्ह्यात सर्वसाधारण ३ लाख ६१ हजार ५४ पैकी ९ हजार ७२४ हेक्टरवर पेरणी झाली. पेरणी क्षेत्रात सोयाबीनची २ हजार ५६ हजार ४०४ पैकी ६ हजार ७४० हेक्टर, तुरीची ४५ हजार ३०६ पैकी १ हजार २७९ हेक्टर, मुगाची ७ हजार ७८२ पैकी ३०० हेक्टर, उडदाची ५ हजार ८७९ पैकी २५० हेक्टर पेरणी झाली आहे.

कपाशीची ३८ हजार ८२१ पैकी १ हजार १५५ हेक्टरवर लागवड झाली आहे. वसमत तालुक्यात १२० हेक्टर, औंढा नागनाथ तालुक्यात ८ हजार १०० हेक्टर, सेनगाव तालुक्यात १ हजार ५०४ हेक्टर पेरणीचा समावेश आहे. हिंगोली, कळमनुरी तालुक्यात अद्याप पेरणी झाल्याची नोंद नाही.

या दोन जिल्ह्यात आजवर झालेल्या पेरणी मध्ये कपाशीचे लागवड क्षेत्र ७ हजार ८५९ हेक्टर आहे. सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनावर कपाशीची लागवड केली आहे. जिरायती क्षेत्रात अनेक भागातील शेतकऱ्यांनी धूळ पेरणी पद्धतीने कपाशीची लागवड केली आहे.

परंतु अपुऱ्या ओलाव्या अभावी बियाण्याची उगवण व्यवस्थित होत नाही. ठिबक सिंचनावरील कपाशीची वाढ होत आहे. परंतु हरिण उगवलेले पीक खात आहेत. त्यामुळे दुबार पेरणीचे सावट आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT