Rain  Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : मुळशी धरणक्षेत्रात १२७ मिलिमीटर पाऊस

Team Agrowon

Pune News : जिल्ह्यातील धरण क्षेत्रांत पावसाचा जोर कमी-अधिक होत आहे. प्रामुख्याने मुठा आणि नीरा धरणक्षेत्रात हलका ते मध्यम पाऊस बरसत आहेत. शुक्रवारी (ता.१९) सकाळी आठ वाजेपर्यंत मुळशी धरणक्षेत्रात सर्वाधिक १२७ मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांत ४७.८६ टीएमसी म्हणजेच २४ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.

जिल्ह्यांच्या पश्चिम पट्ट्यात जोरदार पाऊस पडत आहे. प्रामुख्याने शिरोटा, ठोकरवाडी, वळवण, लोणावळा, कुंडली या घाटमाथ्यांवर १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस पडला आहे. सध्या धरणक्षेत्रात मॉन्सून दाखल झाल्यापासून पाऊस कमी-जास्त होत आहे.

काही वेळा अतिवृष्टी होत आहे. रविवारी (ता.१४) ४.३२ टीएमसी, तर सोमवारी (ता.१५) ५.७९ टीएमसी पाण्याचा येवा दाखल झाला होता. जिल्ह्यातील धरणांत उपयुक्त ४१.७० टीएमसी म्हणजेच २१ टक्के पाणीसाठा झाला आहे. सोमवारी पावसाचा जोर मंदावल्याने मंगळवारी (ता. १६) धरणांतील पाण्याची आवक काही प्रमाणात कमी झाली आहे. मागील २४ तासांमध्ये जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे धरणांत २.६० टीएमसी पाणी दाखल झाले आहे.

मुठा खोऱ्यातील टेमघर धरणक्षेत्रात सर्वाधिक ४५ मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे या धरणात २४ तासांमध्ये ०.०४ टीएमसी पाण्याचा येवा दाखल झाला आहे. या धरणांत एक जूनपासून ते आत्तापर्यंत एकूण १.१२ टीएमसी उपयुक्त पाणी दाखल झाले आहे. वरसगाव धरणक्षेत्रात ३० तर, पानशेतमध्ये २७ मिलिमीटर पाऊस पडला. खडकवासला धरणक्षेत्रात तुरळक सरी बरसल्या. मुठा खोऱ्यातील धरणांत एक जूनपासून ते आतापर्यंत १२.२१ टीएमसी पाणी आले आहे.

नीरा खोऱ्यातील धरणक्षेत्रात कमी-अधिक पाऊस आहे. वडिवळे धरणक्षेत्रात ७३ मिलिमीटर, तर नीरा देवघर ४४, भाटघर ११, पवना ३३, भामा आसखेड, आंध्रा २१, गुंजवणी येथे २४ मिलिमीटर पाऊस झाला. कासारसाई, कळमोडी, भाटघर, चासकमान, नाझरे, वीर या धरणक्षेत्रात हलका पाऊस झाला. त्यामुळे या धरणक्षेत्रातील धरणांत नव्याने अवघा १.१४ टीएमसी पाणीसाठा दाखल झाला आहे.

उजनी धरणक्षेत्रात उघडीप

कुकडी खोऱ्यातील पिंपळगाव जोगे, माणिकडोह, वडज, डिंभे, चिल्हेवाडी या धरणक्षेत्रात तुरळक सरी पडल्या. तर येडगाव, घोड, विसापूर, उजनी धरणक्षेत्रात पावसाची उघडीप असून ढगाळ वातावरणाची स्थिती कायम आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pm Aasha Scheme : 'पीएम आशा'तून शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांचं कल्याण ?

Rain Maharashtra : राज्यात पावसाला पोषक हवामान; शुक्रवारी मराठवाड्याला 'येलो अलर्ट'  

Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा

Soybean Yellow Mosaic : मळेगावातील सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव

Poultry Business : भांडवलाअभावी पोल्ट्री व्यवसाय धोक्यात, सांगली जिल्ह्यात परिस्थिती

SCROLL FOR NEXT