Crop Damage Flood Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : पीकविमा कंपनीकडे नुकसानीच्या १२ हजार तक्रारी

Crop Insurance : सोलापूर जिल्ह्यात मागच्या आठवड्यात सलगपणे ३१ ऑगस्ट, १ आणि २ सप्टेंबर असे तीन दिवस पावसाने जोरदार हजेरी लावली.

Team Agrowon

Solapur News : सोलापूर जिल्ह्यात गेल्या आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामध्ये खरिपातील पिकांचे मोठे नुकसान झाले, या नुकसानीच्या जवळपास १२ हजार तक्रारी शेतकऱ्यांनी पीकविमा कंपन्यांकडे केल्या असून, त्यापैकी जवळपास ७ हजार तक्रारींची पडताळणी विमा कंपनीने केली आहे.

सोलापूर जिल्ह्यात मागच्या आठवड्यात सलगपणे ३१ ऑगस्ट, १ आणि २ सप्टेंबर असे तीन दिवस पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाने जिल्ह्याची वार्षिक सरासरी ओलांडली. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ४८१.१ मिलिमीटर आहे.

पण प्रत्यक्षात ५१६.६ मिलिलिटर एवढा पाऊस झाला. या पावसाने खरिपातील मूग, उडीद आणि सोयाबीनचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी मूग आणि उडदाच्या काढणी सुरू आहेत. पण या पावसामुळे त्यात व्यत्यय आणलाच. पण पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

अनेक ठिकाणी उडीद आणि मूग शिवारात काढून टाकला होता, तो भिजून गेला, तर काही ठिकाणी शेतात पाणी साठल्याने पिके पिवळी पडू लागली आहेत. दरम्यान, या नुकसानीनंतर कृषी विभागाने तातडीने पंचनाम्याचे काम सुरू केले आहे.

तसेच पीकविम्यात सहभाग घेतलेल्या शेतकऱ्यांना ७२ तासांच्या आत संबंधित पीकविमा कंपनीला नुकसानीची पूर्वसूचना द्यावी लागणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १२ हजार शेतकऱ्यांनी विमा कंपनीला तक्रारी दिल्या आहेत. त्यापैकी जवळपास ७ हजार तक्रारींची पडताळणी विमा कंपनीकडून कऱण्यात आली आहे. आता पुढील कार्यवाही कधी आणि कशी होणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.

विमा कंपन्यांकडे शेतकऱ्यांनी तक्रारी दिल्या आहेत, आमच्या पातळीवरही आम्ही नुकसानीचे प्राथमिक अंदाज घेण्यासाठी कृषी सहायकांना सांगितले आहे. एक-दोन दिवसात तोही नेमका आकडा समोर येईल.
-दत्तात्रय गावसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT