Himachal Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशात पावसामुळे ऑगस्टमध्ये १२० जणांचा मृत्यू

Himachal Pradesh Rain : हिमाचल प्रदेशमध्ये पावसाने कहर माजवला आहे. राज्यात ढगफुटी, घरं पडून आणि भूस्खलनामुळे १२० जणांचा मृत्यू झाला आहे. हिमाचलमध्ये पावसामुळे जवळपास 10 हजार कोटींचं नुकसानही झालं आहे.

Team Agrowon

Shimla News : हिमाचल प्रदेशमधील बहुतांश भागात पाऊस हजेरी लावत असून प्रामुख्याने पालमपूर येथे गुरुवारीही (ता. २४) पावसाची नोंद झाली. बुधवार सायंकाळपासून ते गुरुवारपर्यंत १३७ मिमी पावसाची नोंद झाली. नहान येथे ९३ मिमी, सिमला येथे ७९ मिमी, धर्मशाला येथे ७० मिमी आणि मंडी येथे ५७ मिमी पावसाची नोंद झाली.

ऑगस्टमध्ये पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांत १२० जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण २३८ जणांचा मृत्यू झाला असून ४० जण अद्याप बेपत्ता आहेत. याशिवाय राज्यभरातील ७०९ रस्ते बंद आहेत.

सिमल्यात आतापर्यंत २०१७ मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. या पावसाने १२२ वर्षांचा विक्रम मोडला गेला आहे. मंडी, सिमला आणि सोलन येथे गेल्या चोवीस तासांत चार ठिकाणी ढगफुटी झाली. एकाच दिवसांत ११ जणांचा मृत्यू झाला असून १८ वाहनांची हानी झाली. सिमल्यातील वाहतूक सुरक्षितेसाठी बंद केली आहे. मुख्यमंत्र्यांकडून चोवीस तास लक्ष ठेवले जात आहे.

हिमाचल प्रदेशाने यंदाच्या मॉन्सूनमध्ये दोन महिन्यांत तीन दिवस विक्रमी पावसाचा अनुभव घेतला. पहिला पाऊस ९ आणि १० जुलै रोजी मंडी आणि कुलू जिल्ह्यात पडला. सिमला आणि सोलन जिल्ह्यात १४ आणि १५ ऑगस्टला पावसाने विक्रमी हजेरी लावली. सिमला शहराने मंगळवारी (ता. २२) रात्री मुसळधार पावसाचा मारा सहन केला.

शहरात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आणि भूस्खलनाचे प्रकार घडले. या तिन्ही पावसाने हिमाचल प्रदेशची मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली. मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी बुधवारी (ता. २३) सांगितले, की आतापर्यंत राज्य सरकारने १६५.२२ कोटी रुपयांचे वाटप केले आहे. यातील काही पैसा पूल, रस्ते आणि घराच्या डागडुजीसाठी वापरला जात आहे. या पावसामुळे १० हजार कोटींचे नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agripreneurship MOU: कृषी विद्यापीठ, सह्याद्री फार्म्समध्ये करार

Jalalakshmi Irrigation Scheme: जललक्ष्मी प्रवाही योजनेचा २३ गावांतील शेतीला लाभ

Tiger Attack Compensation: सोनवणे कुटुंबाला १० लाखांचा धनादेश

Solapur Development Projects: वारी, कॉरिडॉर, आयटी पार्कला ‘टॉप प्रायोरिटी’

Sugarcane Payments Pending: उसाचे पेमेंट न मिळाल्याने शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण

SCROLL FOR NEXT