ShaktiPeeth Highway agrowon
ॲग्रो विशेष

ShaktiPeeth Highway : शक्तिपीठ महामार्ग रद्दसाठी सांगली जिल्ह्यातील गावकरी एकवटले, १२ ग्रामपंचायतींचा महामार्ग रद्दचा ठराव

ShaktiPeeth Highway Sangli : शक्तिपीठ महामार्गासाठी जमिनीची मोजणी आणि रेखांकनालाही शासनाने मंजुरी देऊन कामाला गती देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

sandeep Shirguppe

Sangli Shaktipeeth Mahamarg : शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापूरनंतर सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करण्यास सुरूवात केली आहे. सांगली जिल्ह्याच्या १५ गावांतून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाविरोधात १२ ग्रामपंचायतींनी थेट ग्रामसभा घेत महामार्ग रद्दचा ठराव केला आहे. शक्तिपीठ महामार्गामुळे हजारो शेतकरी भूमिहीन होणार आहेत. तो रद्द करण्यात यावा, अशा मागणीचा ठराव करण्यात आला.

मागणी नसताना ठेकेदारांचे हित जोपासण्यासाठी शक्तिपीठ महामार्ग करण्याचा शासनाने प्रयत्न करू नये. अशीही ग्रामसभेत मागणी केली. कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ होऊ देणार नाही. अशी आक्रमक भूमिका सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घेतली.

पवनार ते पत्रादेवी या ८०२ किलोमीटरच्या शक्तिपीठ महामार्गासाठी आरेखनाची अंतीम मान्यता राज्य सरकारने दिली. शक्तिपीठ महामार्गासाठी जमिनीची मोजणी आणि रेखांकनालाही शासनाने मंजुरी देऊन कामाला गती देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. सरकारच्या या आदेशावर १२ जिल्ह्यातून तीव्र विरोध होऊ लागला आहे. या विरोधात २४ जानेवारीला राज्यव्यापी आंदोलनही करण्यात आले.

१२ गावातील शेतकऱ्यांचा विरोध

शक्तिपीठ महामार्ग सांगली जिल्ह्यातील शेटफळे (ता. आटपाडी) येथू प्रवेश करणार आहे. खानापूर तालुक्यातील बाणूरगड, कवठेमहांकाळ तालुक्यातील तिसंगी, तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी, सावळज, अंजनी, वज्रचौंडे, मणेराजुरी, मतकुणकी, मिरज तालुक्यातील कवलापूर, बुधगाव, बिसूर, कर्नाळ, पद्माळे, सांगलीवाडी या गावांतून महामार्ग जाणार आहे.

या गावांपैकी शेटफळे, तिसंगी, बाणूरगड या गावांनी शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याबाबत कोणताही ठराव केला नाही. पण, उर्वरित १२ गावांनी आमच्या गावातील शेतकऱ्यांना भूमिहीन करणारा शक्तिपीठ महामार्ग नको, अशा मागणीचा ठराव केला आहे.

कृष्णा नदीकाठची गावे महापुरात बुडणार

कृष्णा नदीला तीनवेळा महापूर आला असून, सांगली शहरासह नदीकाठच्या गावांना फटका बसला आहे. शक्तिपीठ महामार्गाला भरावा पडणार असल्याने नदीकाठची गावे महापुरात बुडणार आहेत. हजारो शेतकऱ्यांचे स्थलांतर करावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर शक्तिपीठ रद्द करावा. असे अखिल भारतीय किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष उमेश देशमुख म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget 2026: कृषी शिक्षण, संशोधनावरील तरतूद वर्षागणिक तोकडीच

Bharat-VISTAAR AI: अर्थसंकल्पातून 'भारत विस्तार एआय'ची घोषणा, याचा शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Sandlwood Cultivation : चंदन लागवडीसाठी अर्थसंकल्पात तरतूद; पाच राज्यांमध्ये चंदनाची सर्वाधिक लागवड

Groundwater Management: सर्व विभागाच्या समन्वयातून भूजल व्यवस्थापनाची गरज

Union Budget 2026: कृषी, ग्रामीण उद्योगासह शेतकरी हिताचा संकल्प

SCROLL FOR NEXT