Agricultural Sanjeevani Project Agrowon
ॲग्रो विशेष

POCRA Subsidy : ‘पोकरा’चे १२ कोटींवर अनुदान प्रलंबित

Team Agrowon

Parbhani News : जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (हवामान अनुकूल कृषी प्रकल्प : पोकरा) अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या विविध घटकांसाठी मंगळवार (ता. २१) अखेरपर्यंत ३७ हजार ६७८ लाभार्थी शेतकऱ्यांना १२२ कोटी ४१ लाख ७० हजार ९३९ रुपये एवढे अनुदान थेट लाभ हस्तांतरण प्रणालीद्वारे (डीबीटी) बँक खात्यावर वितरित करण्यात आले आहे. अजून २ हजार ४६३ शेतकऱ्यांचे १२ कोटी ९९ लाख रुपये अनुदान प्रलंबित आहे.

पोकरा अंतर्गत एकूण ३ टप्प्यांत परभणी जिल्ह्यातील ९ तालुक्यांतील २५६ ग्रामपंचायतीअंतर्गत २७५ गावांची निवड झालेली आहे. या गावांतील ६६ हजार २६७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी ६३ हजार ७१२ शेतकऱ्यांची पडताळणी झाली.

या शेतकऱ्यांनी तुती लागवड, तुषार सिंचन संच, ठिबक सिंचन, शेततळे, शेडनेटगृह, हरितगृह, मत्यपालन आदी वैयक्तिक घटकांच्या लाभासाठी १ लाख ९१ हजार ८७३ अर्ज केलेले आहेत. कृषी सहायक (डेस्क क्रमांक १) स्तरावर मंजुरीसाठी ३ हजार ६६४ अर्ज, तर कृषी सहायक स्तरावर (डेस्क २) स्थळ पाहणीसाठी ९ हजार ३१२ अर्ज प्रलंबित आहेत.

पूर्वसंमतीसाठी तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी स्तरावर १ हजार ३०५ अर्ज प्रलंबित आहेत. शेतकरी स्तरावर कामे करुन बिल अपलोड करायचे शिल्लक १ हजार ७७३ अर्ज, मोका तपासणीसाठी १ हजार ११० अर्ज, उपविभागीय कृषी अधिकारी लेखाधिकारी स्तरावरील २४ अर्ज तर अंतिम मंजुरीसाठी डेस्क ६ वर ३ अर्ज प्रलंबित होते.

अनुदानासाठी आवश्यक त्या पडताळणीनंतर मंगळवार (ता. २१) पर्यंत थेट लाभ हस्तांतर अनुदान जमा करण्यात आले.

पोकराअंतर्गत वैयक्तिक लाभ घटकनिहाय लाभार्थी संख्या, अनुदान रक्कम (कोटींत)

घटक लाभार्थी संख्या अनुदान रक्कम

तुषार संच २०१४३ ३६.९५

ठिबक संच ४६३९ ३४.१८

फळबाग लागवड २७७६ १०.७३

बीजोत्पादन ५६१७ ६.२०

शेडनेट हाउस १२१ १२.७९

पॉलिहाउस २० २.५४

कृषी यांत्रिकीकरण ५९८ ४.२२

वैयक्तिक शेततळी १८८ ४.१९

विहिरी २८० ५.३०

पाईप्स १५८९ ३.१२

वॉटरपंप ७२२ ०.९८

रेशीम शेती ४८ ०.२६

शेडनेट साहित्य ०.२८ ०.३१

कंपोस्ट खत युनिट ८१ ०.०५

शेततळे अस्तरीकरण ११ ०.०९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

SCROLL FOR NEXT