POCRA : ‘पोकरा’तून अवजारांसाठी दोन वेळा पूर्वसंमती

Agriculture Implements : समोर आलेल्या अहवालातील माहितीनुसार, २०२० मध्ये एका गटाला जुलै महिन्यात सात अवजारांसाठी पूर्वसंमती दिली होती. त्यानंतर पुन्हा याच वर्षात डिसेंबरमध्ये ९ अवजारांना पूर्वसंमती दिली.
POCRA
POCRAAgrowon
Published on
Updated on

Akola News : जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पात (पोकरा) अधिकाऱ्यांच्या वरदहस्तामुळे अनुदान खिरापतीसारखे वाटले गेले. एकाच गटाला दोन-दोन वेळा पूर्वसंमती देत झुकते माप दिले. जिल्ह्यातील कृषी अवजारे बँकांची शेतकरी गट, कंपनीनिहाय बुलडाणा जिल्ह्यातील समितीने मोका तपासणी केली होती.

या बाबत सादर केलेल्या अहवालाची माहिती आता समोर आली आहे. त्यानुसार अनियमितता झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आल्यानंतर संबंधितांना कारणे दाखवा नोटीस देऊन उत्तरे मागविण्याची प्रक्रियासुद्धा यापूर्वीच सुरू झालेली आहे.

समोर आलेल्या अहवालातील माहितीनुसार, २०२० मध्ये एका गटाला जुलै महिन्यात सात अवजारांसाठी पूर्वसंमती दिली होती. त्यानंतर पुन्हा याच वर्षात डिसेंबरमध्ये ९ अवजारांना पूर्वसंमती दिली. दोन्ही पूर्वसंमतीमध्ये कल्टीवेटर, पेरणीयंत्र, बीबीएफ पेरणीयंत्राला दोन वेळा पूर्वसंमती प्रदान केली गेली.

दोन वेळा लाभ देण्याचा प्रयत्न झाला. तथापि, बुलडाणा जिल्ह्यातील पथकाने मोका तपासणी केली, तेव्हा ही अवजारे एकच आढळली. शिवाय कल्टीवेटर, बहुपीक मळणीयंत्र, पेरणी यंत्र या अवजारांचा दर हा बाजार किमतीपेक्षा खूप जास्त लावल्याचा शेरा तपासणी अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे नोंदविलेला आहे.

POCRA
POCRA Scheme : शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी ‘पोकरा’त ६ हजार कोटींची तरतूद

एका शेतकरी गटाला डिसेंबर २०२० आणि २०२१ अशी दोन वेळा पूर्वसंमती दिली गेली. ही पूर्वसंमती देताना तीनफाळ नांगर, रोटावेटर, बहुपीक मळणी यंत्र, बीबीएफ पेरणी यंत्र अशा चार अवजारांचा यापूर्वी लाभ देऊनही दोन वेळा पूर्वसंमती दिली गेली. एका गटाची अवजारे तपासणीला गेलेल्या पथकाला त्या ठिकाणी गटाने घेतलेल्या काही अवजारांवर गटाचे नाव दिसून आले नव्हते. ट्रॅक्टर व ट्रॉलीचे आरटीओ पासिंग सुद्धा झालेले नव्हते.

POCRA
Pocra Scheme : ‘पोकरा’प्रकरणी तारांकित प्रश्‍न

दुसऱ्या गटाने बीबीएफ पेरणी यंत्र नसतानाही लाभ मिळविला. एका गटाच्या तपासणीस्थळी भेट दिली तेव्हा सर्व अवजारे बाहेरगावी असल्‍याचे कारण देण्यात आले होते. काही गटांकडे अवजारे जुनीच असल्याचे आढळून आले. एका गटाला २०२१ मध्ये दोन वेळा पूर्वसंमती दिली. त्यामध्ये लहान ट्रॅक्टर, मोठे ट्रॅक्टर, कल्टीवेटर आणि ट्रेलर अशा अवजारांना दोनदा लाभ दिला. ही नमुना दाखल उदाहरणे असून असे असंख्य घोळ करण्यात आले असल्याची शक्यता बळावली आहे.

‘चांगली योजना बदनाम’

‘‘उपरोक्त प्रकार वरदहस्ताविना होऊ शकत नाही, असे कृषी खात्यातील जबाबदार अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. त्यावेळीच या प्रकारांना आळा घातला गेला असता तर असे प्रकार झाले नसते. एक चांगली योजना बदनाम झाली,’’ असेही हा अधिकारी म्हणाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com