Solapur Market Committee onion
ॲग्रो विशेष

Solapur Market Committee : सोलापूर बाजार समितीत १ हजार १६४ ट्रक कांद्याची आवक

Solapur Onion : सोलापूर बाजार समिती कांद्याची आवक कमीच असून मागील तीन दिवसांत एक हजार १६४ गाड्या कांदा आला आहे. ही आवक यंदाच्या वर्षातील उच्चांकी आवक आहे.

sandeep Shirguppe

Market Committee : सोलापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील तीन दिवसांत तब्बल ११६४ ट्रक कांदा आवक झाला आहे. जुन्या कांद्याची आवक कमी होऊन नवीन कांदा बाजारात येण्यास सुरूवात झाली आहे. गुरूवारी (ता. २४) बाजार समितीत कांद्याला प्रतिक्विंटल २ हजार ३०० रुपये तरे ५ हजार ६०० रुपये असा भाव राहिला. तर नवीन कांद्याला २ हजार ५०० ते ५ हजार असा दर मिळत होता.

सोलापूर जिल्ह्यात ३० हजार हेक्टरवर यंदा कांदा लागवड झाली आहे. परंतु अचानक होत असलेल्या पावसाने अनेकांचा कांदा जागेवरच खराब झाला असल्याने उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या मागणीच्या प्रमाणात बाजारात कांदा कमी असल्याने भाव समाधानकारक मिळत आहे. बांग्लादेशातही कांद्याची मागणी वाढली असून आगामी काळात दरात आणखी सुधारणा होण्याची शक्यता आहे.

अजूनही सोलापूर बाजार समिती कांद्याची आवक कमीच असून मागील तीन दिवसांत १ हजार १६४ गाड्या कांदा आला आहे. ही आवक यंदाच्या वर्षातील उच्चांकी आवक आहे. जुन्या कांद्यापेक्षा आता नवीन कांदाच अधिक असल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले.

कर्नाटकासह सोलापूर, पुणे, धाराशिव, नाशिक, सातारा येथून सोलापूर बाजार समितीत कांदा विक्रीसाठी येत आहे. आता पावसाळा संपल्याने वाहतूक व्यवस्था सुरळीत झाल्याने व्यापाऱ्यांना खरेदी केलेला कांदा न्यायला अडचणी राहिलेल्या नाहीत. याशिवाय कांद्याला मागणीही वाढत असल्याने आगामी काळात कांद्याचे दर वाढतील, अशी शेतकऱ्यांना आशा आहे.

तीन दिवसातील आवक

बाजार समितीत सोमवारी ४३७ गाड्या कांदा आला होता. प्रतिक्विंटल २ हजार ४०० ते ४ हजार ९०० रूपयांपर्यंत भाव मिळाला.

मंगळवारी ३४५ गाड्या कांद्याची आवक होती. त्यासाठी प्रतिक्विंटल २ हजार ६०० रुपये ते ५ हजार १०० रुपयांपर्यंत दर होता.

बाजार समितीत बुधवारी ३८२ गाड्या कांदा आला होता. सरासरी भाव २ हजार ३०० तर सर्वाधिक दर ५ हजार ६०० रुपयांपर्यंत मिळाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Drone Scheme: तेलंगणा सरकार शेतकऱ्यांना अनुदानित दरात शेतीसाठी ड्रोन पुरवणार

Agriculture Irrigation: ‘सूर्या’ची बळीराजावर कृपा

Udgir Development Fund: उदगीरच्या विकासासाठी ३१ कोटींचा निधी मंजूर

Farmer Compensation: नदीकाठच्या शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षाच

Shepherds Migration: मेंढपाळांचा मुक्काम पूर्व खानदेशातील तालुक्यांत कायम

SCROLL FOR NEXT