प्रकल्पांतील पाणीसाठ्यांनी वाढविली चिंता
प्रकल्पांतील पाणीसाठ्यांनी वाढविली चिंता Agrowon
ॲग्रो विशेष

Water Crisis : पिण्यासाठी जल प्रकल्पांतील ११.५८ दलघमी पाणी राखीव

Team Agrowon

Parbhani News : यंदा परभणी जिल्ह्यात झालेल्या कमी पर्जन्यमानामुळे येत्या काळात अनेक गावांमध्ये गंभीर पाणीटंचाई उद्‍भवणार आहे. जिल्ह्यातील २१३ गावांतील ५ लाख २० हजारांवर लोकसंख्या व १ लाख ५२ हजारांवर पशुधनास पिण्यासाठी मोठ्या, मध्यम, लघू प्रकल्प, गोदावरी नदीवरील उच्च पातळी बंधारे मिळून एकूण १३ जल प्रकल्पांतील ११.५८ दलघमी पाणीसाठा १ फेब्रुवारी ते १५ जुलै २०२४ पर्यंत राखीव करण्यात आला आहे.

येत्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील अनेक गावांतील पाणीटंचाईचे संकट अधिक तीव्र होणार आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत ग्रामपंचायतीकडून टंचाई कृती आराखडे मागविण्यात आले आहेत. टंचाई निवारण उपायोजनेअंतर्गत जिल्ह्यातील तसेच शेजारील जिल्ह्यातील प्रकल्पांवर पाणीपुरवठ्यासाठी अवलंबून असलेल्या २१३ गावांतील नागरिक व पशुधनाची दैनंदिन ४० लिटर पाण्याची गरज आहे.

ती लक्षात घेऊन १९ प्रकल्पांतील ११.५८ दलघमी पाणीसाठा राखीव केला आहे. त्यात पाणीपुरवठ्यासाठी जायकवाडीतील ०.४२६१ दलघमी पाणीसाठा परभणी तालुक्यातील १० गावांसाठी व ०.९२२१ दलघमी पाणीसाठा मानवत तालुक्यातील १९ गावांसाठी राखीव केला आहे.

येलदरी धरणातील ०.७५४९ दलघमी पाणीसाठा जिंतूर तालुक्यातील १६ गावांसाठी व १.४० दलघमी पाणीसाठा पूर्णा तालुक्यातील १८ गावांसाठी, माजलगाव धरणातील ०.१३६४ दलघमी पाणीसाठा गंगाखेड तालुक्यातील ४ गावांसाठी, निम्न दुधना प्रकल्पातील १.६० दलघमी पाणीसाठा परभणी तालुक्यातील २५ गावांसाठी १.०२ दलघमी पाणीसाठा सेलू तालुक्यातील २० गावांसाठी व ०.२८ दलघमी पाणीसाठा मानवत तालुक्यातील ८ गावांसाठी राखीव केला आहे.

करपरा मध्यम प्रकल्पातील २.७९ दलघमी पाणीसाठा जिंतूर व सेलू तालुक्यांतील १६ गावांसाठी तर मासोळी मध्यम प्रकल्पातील ०.५८५८ दलघमी पाणीसाठा गंगाखेड तालुक्यातील १३ गावांसाठी राखीव आहे. गोदावरी नदीवरील ढालेगाव उच्च पातळी बंधाऱ्यातील ०.१४८५ दलघमी पाणीसाठा पाथरी तालुक्यातील ९ गावांसाठी, तारूगव्हाण बंधाऱ्यातील ०.११ दलघमी पाणीसाठा पाथरी तालुक्यातील ६ गावांसाठी तर मुद्‍गल बंधाऱ्यातील ०.०८ दलघमी पाणीसाठा पाथरी तालुक्यातील ४ गावांसाठी व ०.०४ दलमघी पाणीसाठा सोनपेठ तालुक्यातील ३ गावांसाठी राखीव आहे.

मुळी बंधाऱ्यातील ०.१९ दलघमी पाणीसाठा गंगाखेडमधील ७ गावांसाठी तर डिग्रस बंधाऱ्यातील ०.१७ दलघमी पालममधील ९ व ०.३५ दलघमी पाणीसाठा पूर्णामधील १० गावांसाठी राखीव आहे. पेडगाव तलावातील ०.२७ दलघमी पाणी परभणी व मानवत तालुक्यातील ९ गावांसाठी तर झरी तलावातील ०.२४ दलघमी पाणी पाथरीतील ७ गावांसाठी राखीव केला आहे.

नद्या-नाले कोरडे

यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ३१५.४० मिलिमीटर कमी पाऊस झाला आहे. मोठ्या, मध्यम, लघू प्रकल्पांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत अत्यंत कमी पाणीसाठा आहे. नद्या, नाले कोरडे पडले आहेत. उपसा सुरू असल्यामुळे भूजल पातळी खालावली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Budget 2024 : 'लबाडाचं निमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही', अर्थसंकल्पावरून विरोधकांची सरकारवर जोरदार टीका

Allocation of Agricultural Inputs : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना कृषी निविष्ठा वाटप

Maharashtra Rain : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ६७ मंडलांत पाऊस

Agriculture Technology : डहाणू तालुका यांत्रिकीकरणाने समृद्ध होणार

Budget 2024 : सरकारकडून बळीराजाला काय मिळालं? शेतकऱ्यांसाठी घोषणांचा पाऊस

SCROLL FOR NEXT