Akola News : अकोला जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या मॉन्सूनपूर्व पावसामुळे उन्हाळी पिके व फळबागांचे अतोनात नुकसान झाले. या बाबतचा संयुक्त सर्वेक्षणाचा अंतिम अहवाल तयार झाला असून ७ हजार ५९३ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे.
त्यामुळे नुकसान भरपाईसाठी २० कोटी ९३ लाखांची आवश्यकता आहे. या बाबत मदतनिधीची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. या पावसाचा फटका ६०५ गावांतील ११ हजार २६ शेतकऱ्यांना बसला आहे.
मे महिन्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह पाऊस झाला होता. यामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले. या नुकसानीला एक महिना लोटला तरी अंतिम अहवाल तयार झाला नव्हता. अखेरीस हा अहवाल देण्यात आला. यानुसार मे महिन्यात पातूर तालुक्यातील काही गावांमध्ये ९ ते १३ मे दरम्यान मॉन्सूनपूर्व पाऊस झाला.
त्याचा फटका तालुक्यातील आठ गावांना बसला. यामुळे २३४.३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यात लिंबू, कांदा, आंबा, उन्हाळी मूग व उन्हाळी उडीद या पिकांचा समावेश आहे. १९ ते २२ मे दरम्यान सुद्धा जिल्ह्यातील तीन तालुक्यांत पाऊस झाला होता.
या पावसामुळे अकोला, पातूर, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी, अकोट, तेल्हारा, बाळापूर तालुक्यांतील १५७ गावे प्रभावित झाली. त्यासोबतच ९०९.३२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. दरम्यान या नुकसानीचे संयुक्त पंचनामे पूर्ण झाले असून अंतिम अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे.
...असे झाले नुकसान
जिल्ह्यातील ५०० गावांतील फळबागा वगळता उन्हाळी पिकांचे नुकसान झाले. १० हजार २३० शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी १९ कोटी २२ लाखांची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. बाधित क्षेत्र ७ हजार ११८ हेक्टर आहे.
या पावसामुळे ४७५ हेक्टर क्षेत्रातील फळबागांना फटका बसला. १०५ गावांतील ७९६ फळबागायतदारांचे नुकसान झाले आहे. त्यासाठी १ कोटी ७१ लाखांची आवश्यकता आहे.
तीळ, ज्वारी, कांदा, उडीत, मुग, भुईमूग व अन्य पिकांना बसला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.