Crop Damage : सत्तारुढ लोकप्रतिनिधींनी भरपाई घेऊन बांधावर यावे

Ravikant Tupkar : पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांचा आदर्श घ्या. कोल्हापूर, सांगलीत महापूर आला तर तिकडच्या नेत्यांनी मदत वाढवून घेण्यासाठी. जीआर बदलून घेतले, कोरडी सहानुभूती नको, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
Agriculture Damage
Agriculture DamageAgrowon
Published on
Updated on

Buldana News : जिल्ह्यात २५ व २६ जूनला झालेल्या अतिवृष्टीत लोणार, मेहकर आणि सिंदखेडराजा तालुक्यांतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानाची शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पाहणी केली.

तसेच सत्ताधाऱ्यांनी फक्त बांधावर येऊन फोटोसेशन करू नये. ताबडतोब मुंबईत जाऊन तळ ठोकून बसा आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई घेऊनच मग वावरात या. आठवडाभरात शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी मदतीची व्यवस्था झाली पाहिजे, अन्यथा शेतकऱ्यांचा संयम सुटण्याची शक्यता आहे, असे आवाहन केले.

Agriculture Damage
Rain Crop Damage : जोरदार पावसामुळे बार्शीटाकळी, पातूर तालुक्यात नुकसान

दोन दिवसांत नुकसानग्रस्त भागाचा अनेक नेत्यांनी दौरा केला. प्रामुख्याने सत्ताधारी नेत्यांना आव्हान देताना ते म्हणाले, की आश्वासने देऊन वेळ मारून नेऊ नका, शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, हे तुमचे कर्तव्य आहे.

Agriculture Damage
Crop Damage Inspection : अतिवृष्टीग्रस्त भागांत केंद्रीय राज्यमंत्री जाधवांकडून पाहणी

पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांचा आदर्श घ्या. कोल्हापूर, सांगलीत महापूर आला तर तिकडच्या नेत्यांनी मदत वाढवून घेण्यासाठी. जीआर बदलून घेतले, कोरडी सहानुभूती नको, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

मेहकर, लोणार, सिंदखेड राजा भागांत तुपकरांनी शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन आपबिती समजून घेतली. आरेगाव, डोणगाव, गोहगाव, पांगरखेड, झोटिंगा, कुंभेफळ, देऊळगाव कोळ, महारचिकना, ब्राह्मणचिकना, खापरखेड घुले, वडगाव तेजन, पारडी सिरसाट यासह अनेक गावांचा दौरा केला. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळाली नाही,तर आक्रमक आंदोलन उभे करू, असा इशाराही दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com