Election Agrowon
ॲग्रो विशेष

Selling Buying Federation Election : खरेदी-विक्री संघाच्या ११ जागा बिनविरोध

Unopposed Election : मोठ्या नाट्यमय घडामोडीनंतरही चार जागांवर एकमत न झाल्याने येवला तालुका खरेदी-विक्री संघाची निवडणूक बिनविरोध होण्याची हॅट्ट्रिक टळली आहे.

Team Agrowon

Nashik News : मोठ्या नाट्यमय घडामोडीनंतरही चार जागांवर एकमत न झाल्याने येवला तालुका खरेदी-विक्री संघाची निवडणूक बिनविरोध होण्याची हॅट्ट्रिक टळली आहे. सर्व नेते एकत्र आल्याने ११ जागा बिनविरोध झाल्या खऱ्या; मात्र चार जागांसाठी नऊ उमेदवार रिंगणात राहिल्याने निवडणूक घेण्याची वेळ आली आहे. या जागांसाठी १७ डिसेंबरला मतदान होऊन १८ ला मतमोजणी होणार आहे.

यापूर्वी २०११ व २०१६ मध्ये सर्व नेत्यांच्या सहमतीतून समर्थकांना संधी देऊन संघाची निवडणूक बिनविरोध झाली होती. या वेळी देखील बिनविरोध निवडीचा वातावरण तयार झाले; मात्र १५ जागांसाठी तब्बल ७५ अर्ज दाखल झाले असल्याने माघारीसाठी शर्थीचे प्रयत्न करूनही निवडणूक बिनविरोध होण्याला ब्रेक लागला आहे.

राजकीय पटलावर नेत्यांचे वेगळेवेगळे गट आणि पक्ष असले तरी संघाची आर्थिक परिस्थिती सक्षम नसल्याने ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे, युवा नेते संभाजीराजे पवार, सहकार नेते अंबादास बनकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुणाल दराडे, भुजबळ यांचे स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे यांच्यात अनेक बैठका होऊन एकमत झाल्याने बिनविरोध निवडणुकीला चालना मिळाली.

नेत्यांमध्ये सहमती होऊन शिवसेनेचे युवा नेते संभाजीराजे पवार यांना सर्वाधिक ५ जागा, माणिकराव शिंदे यांना २, आमदार नरेंद्र दराडे व आमदार किशोर दराडे यांना ३, सहकार नेते अंबादास बनकर यांच्या गटाला ३ तर मंत्री छगन भुजबळ गटाला २ जागा देण्याचे सर्वानुमते ठरले.

त्यानुसार नेत्यांनी आपापल्या समर्थकांची नावे ही निश्चित केली आणि माघारीसाठी सर्वानुमते जोरदार प्रयत्नही झाले. त्याच प्रयत्नांना यश येत ११ जागा बिनविरोध झाल्या. मात्र व्यक्तिगत गटातील चार जागांवर इच्छुकांची संख्या अधिक असल्याने तसेच चळवळीतील कार्यकर्ते या गटात असल्याने आम्हालाही संधी द्या, अशी भूमिका घेऊन त्यांनी निवडणुकीचा निर्णय घेतला.

...यांची लागली वर्णी

सर्वच नेत्यांनी आपापल्या गटांतून नावे निश्चित केल्यानंतर इतरांचे दाखल अर्जही माघारी घेण्यात यश आल्याने सहकारी संस्था गटात मनोज रंधे, ऋषिकेश कुऱ्हे, परसराम गांगुर्डे, प्रताप दाभाडे, संजय सालमुठे, सुनील देशमुख यांची, विमुक्त जाती भटक्या जमाती गटात महेंद्र वैद्य, अनुसूचित जाती जमाती गटात सुमित थोरात, महिला राखीव गटात ताई बोडके व सविता देवरे, इतर मागास प्रवर्ग गटात भास्कर येवले हे ११ उमेदवार बिनविरोध निवडून आले.

...यांच्यात होणार लढत

संघाच्या व्यक्तिगत गटाच्या ४ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यासाठी देविदास गुडघे, रामभाऊ नाईकवाडे, रवींद्र शेळके, पंकज पानसरे, मच्छिंद्र थोरात, विजय कोटमे, श्रावण देवरे, पुंजाराम काळे, ज्ञानेश्वर बोरणारे हे ९ उमेदवार रिंगणात आहेत. \

वैयक्तिक गट वगळता सर्व जागा बिनविरोध निवडून आणण्यात नेते मंडळींना यश आले. मात्र प्रहार संघटना व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यात एकमत न झाल्याने वैयक्तिक गटात त्यांचे प्रत्येकी एक उमेदवार, नेत्यांनी दिलेले ४ उमेदवार व इतर ३ उमेदवार रिंगणात आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: कोकण, घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता

Farmer Suicides: आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात ‘एसएओ’ पद रिक्‍त

Crop Insurance: मुदतवाढीनंतरही पीकविम्याच्या अर्जांमध्ये ५० टक्क्यांची घट

Agri Student Protest: कृषी पदवीधारकांचा परभणीत आक्रोश मोर्चा

Solapur Rain: सोलापूर जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच

SCROLL FOR NEXT