Grampanchayat Election : सरपंचपदी आई, तर मुलगा उपसरपंच

Election Update : शासनाच्या विविध स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळविणाऱ्या, लौकिक निर्माण केलेल्या कापशी रोड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आई व उपसरपंचपदी मुलगा असा योगायोग घडून आला आहे.
Election Update
Election UpdateAgrowon
Published on
Updated on

Akola News : शासनाच्या विविध स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळविणाऱ्या, लौकिक निर्माण केलेल्या कापशी रोड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आई व उपसरपंचपदी मुलगा असा योगायोग घडून आला आहे. जनतेतून सरपंच व सदस्यांनी उपसरपंच निवडला. एकाच कुटुंबात दोन्ही पदे गेली आहेत.

कापशी रोड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी यापूर्वी अंबादास उमाळे कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात विविध विकासकामे सुरू होती. दरम्यानच्या काळात निवडणूक झाली. या निवडणुकीत सरपंचपदी त्यांची आई वेणूताई उमाळे यांना गावकऱ्यांनी निवडले.

Election Update
Election Commission Hearing : राष्ट्रवादी कुणाची ? केंद्रीय निवडणूक आयोगासमोर घमासान

त्यानंतर मंगळवारी (ता. ५) उपसरपंचपदाची निवडणूक झाली. यात सदस्यांनी सर्वानुमते अंबादास उमाळे यांना उपसरपंच नेमले. यातून गावकऱ्यांनी विकासकामासाठी त्यांच्यावर जबाबदारी सोपवल्याचेही स्पष्ट झाले.

आई सरपंच व मुलगा उपसरपंच झाल्याने एक आगळावेगळा विक्रमही बनला. शिवाय गावकऱ्यांनी आदर्शसुद्धा निर्माण केला. आई-मुलगा प्रमुख पदांवर असल्याचा हा दुर्मीळ योगही यानिमित्ताने साधला आहे. सरपंचपदासाठी यापूर्वी म्हणजेच ५ नोव्हेंबरला मतदान व ६ नोव्हेंबर मतमोजणी झाली होती.

Election Update
Farmer Death : शेतकरी आत्महत्यांचे सत्र नांदेड जिल्ह्यात सुरूच

तर उपसरपंचपदाची निवडणूक मंगळवारी घेण्यात आली. मागच्या वेळी मी सरपंच होतो. त्या काळात गावाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला. ते करीत असताना काही कामे अपूर्ण राहिली होती. स्वच्छता अभियानात गावाने विभागस्तरापर्यंत चांगले नाव कमावले. आता राज्यस्तरावर गावाला न्यायचे आहे.

त्यामुळेच गावच्या लोकांनी विकासाची जी दिशा सुरू आहे, ती कायम सुरू ठेवण्याच्या उद्देशाने माझी इच्छा नसतानाही उपसरपंच पदाची संधी दिली. त्यामुळे आम्ही आता गावकऱ्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आई व मी पदावर असल्याने कामे करताना सोयीचे होईल. कुठेही अडचण येणार नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी व नऊ सदस्यांनी एकत्र येत संधी दिली, असे मत कापशी रोड ग्रामपंचायतीचे उपसरपंच अंबादास उमाळे यांनी व्यक्त केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com