Crop Compensation Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Compensation : केवायसीअभावी कोल्हापुरात पूरग्रस्तांचे ११ कोटी थकले

Crop Damage : जिल्ह्यात जुलैमध्ये अतिवृष्टी, पूर व गारपीट जोरात झाली. यामुळे शेती पिके व फळ पिकांचे नुकसान झाले होते. नुकसानीचा अहवाल शासनास सादर केला होता.

Team Agrowon

Kolhapur News : कुडित्रे, जि. कोल्हापूर : जिल्ह्यात जुलैमध्ये अतिवृष्टी, पूर व गारपीट जोरात झाली. यामुळे शेती पिके व फळ पिकांचे नुकसान झाले होते. नुकसानीचा अहवाल शासनास सादर केला होता.

त्यानुसार महसूल व वन विभागाकडून शासन निर्णयानुसार ३० सप्टेंबरला एक लाख ६२ हजार ८०५ बाधित शेतकऱ्यांना १२२ कोटी २४ लाख इतका निधी मंजूर झाला होता. त्यापैकी ५७ हजार ७७४ बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर डीबीटी प्रणालीद्वारे ५१ कोटी ९ लाख रक्कम जमा झाली आहे, तर पूर नुकसानग्रस्त १८ हजार ५ बाधित शेतकऱ्यांची ई-केवायसी नसल्यामुळे ११ कोटी ५९ लाख रुपये भरपाईची रक्कम प्रलंबित आहे.

शासनाकडून १६ डिसेंबरअखेर बाधित एक लाख दहा हजार अकरा शेतकऱ्यांना ९२ कोटी ४२ लाख इतक्या रकमेचा ई-पंचनामा प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंजुरी दिली आहे. त्यापैकी ५७ हजार ७७४ बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटीद्वारे ५१ कोटी ९ लाख रक्कम जमा केली आहे.

३४ हजार २३२ शेतकऱ्यांच्या खात्यावर २९ कोटी ७४ लाख रुपये डीबीटीद्वारे रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली.
महापुराने दोन एकरमधील उसाचे नुकसान झाले. एक महिन्यापूर्वी ई-केवायसी केली. मात्र अद्याप नुकसानभरपाई मिळाली नाही. आमच्या गावामध्ये सुमारे ५०० शेतकऱ्यांची नुकसान भरपाई प्रलंबित आहे. लवकरात लवकर भरपाई मिळावी.
- भिकाजी पाटील, शेतकरी, पाडळी बुद्रुक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT