Farmer Suicide  Agrowon
ॲग्रो विशेष

Farmers Suicide : धक्कादायक! मराठवाड्यात गेल्या वर्षभरात केल्या १०८८ शेतकऱ्यांनी आत्महत्या; यंदा आकडाही वाढला

Farmers Suicide in Marathwada : निसर्गाच्या लहरीपणा आणि सरकारच्या असंवेदनशील धोरणाचा फटका सदानकदा शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. यातूनच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढताना दिसत आहेत.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : यंदा राज्यात निसर्गाच्या लहरीपणा मोठ्या प्रमाणावर दिसला. तर निसर्गामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला धीर न देता फक्त ग्राहकाभिमुख भूमीका केंद्रापाठोपाठ राज्य सरकारने घेतल्या. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. पिकवणारा शेतकरी राजा हा आत्महत्या करत आहे. मात्र यामुळे सरकारला जाग येताना दिसत नाही. सरकारच्या या अडमुठ्या धोरणासह विविध कारणांनी गेल्या वर्षभरात १ हजार ८८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर हा आकडा यंदाही वाढतच आहे. 

राज्यात पडलेल्या अवकाळी पाऊस आणि त्यानंतर पडलेल्या दुष्काळामुळे शेतकरी पुर्ण अडचणीत आला आहे. त्यातच पिकाला योग्य भाव देखील मिळत नसल्याने तो हतबल झाला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. वर्ष २०२३ मध्ये एकट्या मराठवाड्यात १ हजार ८८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून सर्वाधिक आत्महत्या या बीडमध्ये झाल्या आहेत. बीडमध्ये २६९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे अहवालात समोर आले आहे. हा अहवाल विभागीय आयुक्तलयाच्या कार्यालयाकडून देण्यात आला असून ही गंभीर बाब उघडकीस आली आहे. 

बीडसह अन्य जिल्ह्यातही आत्महत्या

विभागीय आयुक्तलयाच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या अहवालात सर्वाधिक आत्महत्या या बीडमध्ये झाल्याचे समोर आले आहे. येथे २६९ आत्महत्या झाल्या आहेत. त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगरमध्ये १८२, नांदेडमध्ये १७५, धाराशिवमध्ये १७१ आणि परभणीमध्ये १०३ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. तर जालना, लातूर आणि हिंगोली येथे अनुक्रमे ७४, ७२ आणि ४२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

अद्यापही १५१ प्रकरणांची चौकशी सुरू

धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटूंबाला सरकार सानुग्रह अनुदान देते त्यातही योग्य काम झालेले नाही. १ हजार ८८ पैकी ७७७ शेतकऱ्यांच्या कुटूंबाला सानुग्रह अनुदानासाठी पात्र ठरविण्यात आले आहेत. तर अद्यापही १५१ प्रकरणांची चौकशी सुरू आहे. प्रशासनानं प्रत्येक प्रकरणाची चौकशी केली असून पात्र ठरणाऱ्या कुटुंबाला १ लाख रुपयांची भरपाई देण्यात आली आहे, अशी देखील माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. 

धक्कादायक आकडेवारी 

मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचा मुद्दा हा गंभीर असून तो आणखी गडद होत चालला आहे. येथे २०२३ या वर्षात दरमाह ९०, तर रोज ३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. दरम्यान, सेवानिवृत्त सनदी अधिकारी सुनील केंद्रेकर यांनी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजनांसाठी दिलेला अहवाल सहा महिन्यांपासून अडगळीला पडला आहे.

मागील चार वर्षांतील आत्महत्याची आकडेवारी

वर्ष आणि शेतकरी आत्महत्या आकडेवारी

२०२०...... ७७३

२०२१...... ८८७

२०२२.......१०२२

२०२३......१०८८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Export : राज्यातून डाळिंब निर्यातीसाठी २१ हजार शेतकऱ्यांची नोंदणी

MahaDBT Portal : ‘महाडीबीटी’वरील अर्जांची नऊ महिन्यांपासून सोडतच नाही

Banana Rate : केळीची कमी दराने खरेदी सुरूच कारवाईसत्र राबविण्याची मागणी

Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

SCROLL FOR NEXT