Farmer Suicide : चाळीसगाव तालुक्यात पंधरा महिन्यांत २९ शेतकरी आत्महत्या

Aslam Abdul Shanedivan

उसनवारीतून शेती

शेतकऱ्यांनी कर्ज काढून खरीप हंगामातील पेरणीचा खर्च केला मात्र पाऊसच झाला नाही. त्यामुळे दुबार पेरण्या केल्या त्यातूनही हाती काहीच आले नाही. त्यामुळे शेतकरी हताश झाला आहे.

Farmer Suicide | Agrowon

ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा

नापिकी, कर्ज, मुलाचे शिक्षण, मुलीचे लग्न अशा विविध कारणांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मोडला गेला आहे.

Farmer Suicide | Agrowon

नैराश्येतून आत्महत्येचा मार्ग

पिकाला योग्य भाव मिळत नाही, दुष्काळी स्थिती, शासनाची न मिळणारी मदत यामुळे शेतकऱ्यांना नैराश्य येते व त्यातूनच आत्महत्येचा मार्ग काही जण पत्करतात असे चित्र आहे.

Farmer Suicide | Agrowon

२९ शेतकऱ्यांची आत्महत्या

चाळीसगाव तालुक्यात गेल्या पंधरा महिन्यांत २९ शेतकऱ्यांनी विविध कारणांनी आत्महत्या केल्या. पंधरा महिन्यांत २९ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे.

Farmer Suicide | Agrowon

पंधरा दिवसाला एक

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांमध्ये कर्जबाजारीपणा हे मोठे कारण आहे. तर प्रत्येक पंधरा दिवसाला एक अशा प्रकारे २९ जणांनी आत्महत्या केल्याचे समोर येत आहे.

Farmer Suicide | Agrowon

सर्वाधिक पाच आत्महत्या

चिंचगव्हाण येथे सर्वाधिक पाच आत्महत्या झाल्या आहेत. त्यामुळे आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने त्या कुटुंबाची परिस्थिती हलाखीचे आहे.

Farmer Suicide | Agrowon

१५ प्रकरणे शासन दरबारी

शेतकरी आत्महत्येची १५ प्रकरणे शासन दरबारी मदतीसाठी पात्र ठरली असून, त्यांची कुटुंबांना शासकीय मदतीची प्रतीक्षा आहे.

Farmer Suicide | Agrowon

Google Map : कार चालकांसाठी महत्वाची सुचना; नव्या वर्षात गुगल मॅपचे हे फिचर होतंय बंद

आणखी पाहा