Department Of Animal Husbandry  Agrowon
ॲग्रो विशेष

Animal Husbandry Department : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाची १०३ पदे रिक्त

Government Recruitment : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्रेणी दोनचे सर्व पशुदवाखाने आता श्रेणी एकमध्ये वर्ग केले आहेत. राज्य आणि जिल्हा परिषदेच्या दवाखान्याचे एकत्रीकरण केले आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाला मंजूर अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या २१५ पदांपैकी १०३ पदे रिक्त आहेत. यामध्ये ७१ पशुधन अधिकाऱ्यांचा समावेश असल्याने शेतकऱ्यांना त्याचा फटका बसत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्रेणी दोनचे सर्व पशुदवाखाने आता श्रेणी एकमध्ये वर्ग केले आहेत. राज्य आणि जिल्हा परिषदेच्या दवाखान्याचे एकत्रीकरण केले आहे.

जिल्ह्यात ९५ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. ७ फिरते दवाखाने मंजूर होते. परंतु तेही बंद करण्यात आले आहेत. ९५ पशुवैद्यकीय दवाखान्याकरिता एकूण २१५ अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. यामध्ये सहाय्यक आयुक्त २०, पशुधन विकास अधिकारी ९१, पशुधन पर्यवेक्षक ९६,आणि पशुधन विकास अधिकारी गट ब -८ या पदांचा समावेश आहे.

परंतु प्रत्यक्षात जिल्ह्यात ११२ पदेच भरलेली असून १०३ पदे रिक्त आहेत. अनेक भागातील दवाखान्यांमध्ये पशुधन अधिकारीच नसल्यामुळे शेतकऱ्यांची कुचंबणा होत आहे. एका पशुधन विकास अधिकाऱ्याकडे तीन-चार पशुसंवर्धन दवाखान्यांचा अतिरिक्त कार्यभार असल्याने कामाचा ताण वाढला आहे.

पशुसंवर्धनसोबत पशुगणना आणि इतर कामे कर्मचाऱ्यांना करावी लागत असल्याने जनावरांवर उपचार करण्याचे मुख्य काम बाजूला पडत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात सुमारे एक लाख ६० हजारांच्या जवळपास पशुधन आहे.

पदाचे नाव मंजूर पदे भरलेली रिक्त पदे

सहाय्यक आयुक्त २० ६ १४

पशुधन विकास अधिकारी ९१ २० ७१

पशुधन विकास अधिकारी (गट ब)८ १ ७

पशुधन पर्यवेक्षक ९६ ८५ ११

एकूण २१५ ११२ १०३

पशुसंवर्धन विभागात रिक्त पदे आहेत ही वस्तुस्थिती आहे. मात्र तरीदेखील शासनाच्या सर्व योजना आणि पशुधनाची आरोग्य सेवा सुरळीत सुरू आहे. रिक्त पदे भरण्याबाबत शासनाला अहवाल सादर करण्यात आलेला आहे. ही पदे लवकरच भरली जातील.
- डॉ. रवींद्र दळवी, सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन विभाग सिंधुदुर्ग (मुख्यालय)
दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शासनाने प्रत्येक पशुसंवर्धन दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारी आणि इतर सर्व यंत्रणा उभी करावी
- रणजित तावडे, पशुपालक, वैभववाडी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Local Body Election : ‘झेडपी’, पंचायत समित्यांचा बिगुल

Fertilizer Shortage : युरिया, डीएपीचा तुटवडा, लिंकिंगने शेतकरी त्रस्त

Ginger Research Center: आले संशोधन केंद्राचा पेच; कृषिमंत्र्यांच विधानपरिषदेत बैठकीचं आश्वासन 

Silk Market : बीड रेशीम कोष बाजारात शेतकऱ्यांचे शोषण

Turmeric Market : नांदेडला हळदीचे चुकारे थकल्याने लिलाव पाडले बंद

SCROLL FOR NEXT