Ladki Bahin Yojana Agrowon
ॲग्रो विशेष

Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेच्या अर्ज छाननीचा पहिला फटका पुण्याला; १० हजार बहिणी अपात्र

Ladki Bahin Yojana Application screening in Pune : लाडकी बहिण योजनेच्या अर्ज छाननीचा मुद्दा गाजत असतानाच पुण्यात तब्बल १० हजार महिला अपात्र झाल्या आहेत.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : गेल्या दोन दिवसापासून लाडकी बहिण योजनेच्या अर्ज छाननीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले होते. यादरम्यान आज (ता.११) पुण्यातील लाडकी बहिण योजनेच्या अर्ज छाननीच्या बातमीने राज्यात खळबळ उडाली आहे. पुणे जिल्ह्यातील तब्बल १० हजार महिला योजनेच्या अर्ज छाननीत अपात्र ठरल्या आहेत.

राज्यात महायुतीचे सरकार येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर मंत्रालयातील पत्रकार भवनातील पत्रकार परिषदेत लाडकी बहिण योजनेच्या अर्ज छाननीवर भाष्य केले होते. तसेच जे निकषात बसणार नाहीत ते अर्ज बाद केले जाती असे संकेत दिले होते. यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, महायुतीला लाडक्या बहिणींची गरज नसल्याची टीका केली होती. तर याबाबत आलेल्या बातम्यांमध्ये कोणतेच तथ्य नसल्याचे महिला बालकल्याण खात्याच्या माजी मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले होते.

पण आता पुणे जिल्ह्यातील मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र अर्जदारांचे अर्ज तपासण्यासाठी निर्देश देण्यात आले आहे. याबाबत महिला बालकल्याण विभागाने दिली असून पहिल्याच छाननीत जिल्ह्यातील तब्बल १० हजार अर्ज बाद झाले आहेत.

दरम्यान विधानसभा निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागल्याने योजनेची कार्यवाही थांबली होती. पण आता सरकार स्थापन झाल्यानंतर पुन्हा एकदा योजनेची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच प्रलंबित अर्जांची छाननी देखील सुरू झाली आहे.

पुणे जिल्ह्यात २० लाख ८४ हजार महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. तर एकूण १५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत २१ लाख ११ हजार ३६३ अर्ज मंजूर करण्यात आले. यातील काही अर्जांची छाननी करणे बाकी होते. याकामाला आता सुरूवात झाली आहे. यावेळी ९ हजार ८१४ अर्ज अपात्र ठरले असून ते बाद करण्यात आले आहेत. तर ५ हजार ८१४ अर्ज किरकोळ त्रुटींमुळे नाकारण्यात आले आहेत.

पुणे शहरातही ३ हजार अर्ज बाद

पुणे जिल्ह्यातील अर्जांची छाननी सुरू झाली असून यामुळे १० हजारांच्या जवळपास महिला अपात्र ठरल्या आहेत. अशाच पद्धतीने अर्ज छाननीत पुणे शहरातील ३ हजार ४९४ अर्ज बाद झाले आहे. तर ६ लाख ८२ हजार ५५ महिलांनी केलेल्या अर्जांपैकी ६ लाख ६७ हजार ४० अर्ज पात्र ठरले आहेत.

यांना लाडकी बहीण योजनेतून वगळा

दरम्यान भाजपचे आमदार नितेश राणे यांनी लाडकी बहीण योजनेतून मुस्लिम महिलांना वगळण्यात यावे, अशी मागणी केली आहे. त्यांच्या अशा मागणीमुळे पुन्हा एकदा विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. नितेश राणे यांनी, मुस्लिम कुटुंबात जर दोन पेक्षा जास्त मुलं असतील तर त्यांना लाडकी बहीण योजनेतून वगळा असं म्हटलं आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जास्तीत जास्त लाभार्थी मुसलमान समाजातील दिसत आहेत. यामुळे आदिवासी समाज वगळता दोन पेक्षा जास्त आपत्य असलेल्या मुसलमान समाजातील महिलांना यातून वगळावे. यामुळे हिंदू समाजाला याचा लाभ मिळेल, असे वक्तव्य केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Land Fragmentation Act: शहरी भागात तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची महसूल मंत्री बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा

QR Code For fertilizer: ‘क्यूआर कोड’वरून कळणार उपलब्ध खते

Bridge For Ghanegar: साकवावरून जीवघेणा प्रवास

Dahanu Floods: डहाणूमध्ये सूर्या नदीला पूर; सतर्कतेचा इशारा

Tree Plantation: दहा हजार वृक्ष लागवडीचा संकल्प

SCROLL FOR NEXT