Almatti Dam Water agrowon
ॲग्रो विशेष

Almatti Dam Water : आलमट्टी धरणात १०० टीएमसी पाणीसाठा, ६० क्युसेक्सने विसर्ग

Kolhapur Rain : पश्चिम महाराष्ट्रातील घाट माथ्यावर होत असलेल्या पावसाने कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

sandeep Shirguppe

Water Storage Almatti dam : महाराष्ट्रातील पावसामुळे आलमट्टीत पाण्याची आवक वाढली आहे. मागच्या २४ तासांत आलमट्टी धरणात ९२ हजार क्युसेक इतकी आवक होती, तर ६० हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी भागातील नद्यांतील पाणीपातळी कमी होऊ लागली आहे. आलमट्टीच्या १४ दरवाजांतून वीजनिर्मितीसाठी ३५ हजार क्युसेक आणि विसर्ग म्हणून २५ हजार क्युसेक असे एकूण ६० हजार क्युसेक पाणी सोडले जात आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील घाट माथ्यावर होत असलेल्या पावसाने कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. दरम्यान या नद्यांमधील वाहणारे पाणी थेट कर्नाटक राज्यातील धरणांमध्ये जाऊन मिळत असल्याने आलमट्टी धरणाचा जलसाठा मोठ्या वेगाने भरत आहे.

आलमट्टी जलाशयात एक जुलै रोजी केवळ ३७ टीएमसी पाणी जमा झाले होते. तर बुधवारी (ता. १७) तब्बल ९९.३१७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. जलाशय ८०.६९ टक्के भरले आहे. म्हणजेच केवळ १६ दिवसांत जलाशयात ६२ टीएमसी पाणी साठा झाला आहे.

महाराष्ट्रात उगम पावलेल्या नद्यांतून वाहून येणारे पाणी चिक्कोडी भागातील विविध नद्यांतून कृष्णा नदीत मिसळून थेट आलमट्टी जलाशयात जात आहे. त्यामुळे या धरणाच्या बॅक वॉटरचा तडाखा बसत आहे. गेल्या काही वर्षांपासून पूरस्थिती हाताळण्यासाठी महाराष्ट्रातील अधिकारी कर्नाटकच्या आलमट्टी धरणातील आवक आणि विसर्गावर लक्ष केंद्रित करण्यासाठी नियुक्त केले आहेत. तर कर्नाटकचे अधिकारी महाराष्ट्रातील कोयना धरणावर नियुक्त केले आहेत. त्यामुळे नियोजनाचा परिणाम म्हणून अधिक पाऊस होऊनही पुराचा फटका बसलेला नाही.

यंदा जूनमध्ये पावसाने चांगली साथ दिलेली नाही. काहीसा पाऊस झाला असला तरी जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे या भागात पावसाची प्रतीक्षा आहे. महाराष्ट्रातील धरणांतून पाणी सोडल्यास व पाऊसही संततधार राहिल्यास आणि आलमट्टीतून विसर्ग नसल्यास नद्यांना पाणी वाढून पूरस्थिती निर्माण होत होती.

यंदा पाऊस कमी असल्याने व महाराष्ट्रातील धरणांत पाणीच नसल्याने विसर्गाचा प्रश्नच आलेला नाही. त्यातच काही दिवस जोरदार पाऊस झाल्याने वाहून येणारे पाणी थेट आलमट्टीला मिळत आहे. परिणामी केवळ पंधरा दिवसांत आलमट्टी धरण शंभर टीएमसीपर्यंत भरण्याकडे आले आहे. बुधवारी आलमट्टीत ९९.३१७ टीएमसी पाणीसाठा झाला.

१२३ टीएमसी क्षमता असलेले आलमट्टी धरण पाऊस नसतानाही गेल्या काही वर्षांपासून लवकर भरत आहे. त्यामुळे नंतर पाऊस वाढल्यावर जादा विसर्ग करावा लागला आहे. त्यातूनच गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये काही वेळेला दोन लाख क्युसेकपर्यंत विसर्ग करावा लागला होता. तो आतापर्यंतचा सर्वाधिक विसा ठरला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Scheme: शेतीसाठी यंत्र खरेदीवर कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत ५०% अनुदान; ऑनलाईन अर्ज कसा करायचा जाणून घ्या

Cotton Crop Loss : अति पावसाने कपाशीचे पीक गेले हातातून

Jayakwadi Dam Water Release : ‘जायकवाडी’तून गोदावरीत ९४३२ क्युसेक पाण्याचा विसर्ग

Thailand-Cambodia War : आता थायलंड-कंबोडियात संघर्ष

Agriculture Warehouse : गोदाम पावती वित्तपुरवठा क्षेत्रासाठी सेवा पुरवठादार

SCROLL FOR NEXT