Almatti Dam Water : कोल्हापूर, सांगलीच्या नद्यांना पूरस्थिती, आलमट्टी धरणातील पाणी पातळीही वाढली

Krushna River : वेदगंगा, दूधगंगा व कृष्णा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची गती अधिक आहे. सध्या कृष्णा नदीत २६ हजारांवर क्युसेक पाणी वाहत आहे.
Almatti Dam Water
Almatti Dam Wateragrowon
Published on
Updated on

Rivers Kolhapur Sangli Flooded : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुरास कारणीभूत असलेल्या आलमट्टी धरणातील पाणी साठ्यात झपाट्याने होत आहे. काळम्मावाडी धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे कर्नाटक आणि सीमाभागातील नद्यांना पूर आला आहे. परिणामी वेदगंगा, दूधगंगा व कृष्णा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची गती अधिक आहे. सध्या कृष्णा नदीत २६ हजारांवर क्युसेक पाणी वाहत आहे.

आलमट्टीत २७ हजार ३८५ क्युसेक पाणी वाहून येत आहे, तर केवळ ५० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. आलमट्टीची सध्याची पाणीपातळी ५१२.०८ मीटर इतकी आहे. धरणात ४१.४११ टीएमसी (३३.६४ टक्के) पाणीसाठा झाला आहे. पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून चांगला पाऊस होत असल्याने नदीत पाणी वाहून येण्याचे प्रमाण वाढले आहे. वेदगंगा व दूधगंगा नदीच्या पातळीत संथ वाढ असली तरी कृष्णा नदीच्या पातळीत मोठी वाढ होत आहे.

दरम्यान दोन दिवसात काळम्मावाडी धरण क्षेत्रात १२९ मिलिमीटर, तर राधानगरी धरण क्षेत्रात ८५ मिलिमीटर पाऊस झाल्याने आणखी दोन दिवस पाणी पातळी वाढणार आहे. त्याची दखल घेऊन प्रशासनाने पुन्हा पूरस्थितीसाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.

बुधवारी प्रांताधिकारी सुभाष संपगावी यांनी कृष्णा नदीच्या पातळीची पाहणी केली. अंकली येथील पुलाजवळ कृष्णा नदीची ५१५.६१ मीटर पाणीपातळी साधारण आहे. येथे सध्या ५२६.५६ मीटर पातळी काल (दि.०३)बुधवारी सकाळी ८ वाजता होती. येथे धोका पातळी ५३७ मीटरवर असल्याने सध्या कुठेही नागरिकांना भीतीची स्थिती नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

Almatti Dam Water
Landslides In Kolhapur : भूस्खलनाचा धोका! कोल्हापुरातील अनेक गावांना सूचना

सदलगाजवळ दूधगंगा नदीची पातळी ५२५.१६ मीटर साधारण आहे. बुधवारी येथे ५३०.८० मीटर पाणी पातळी दिसून आली आहे. येथे धोका पातळी ५३८ मीटरवर असल्याने दूधगंगा व कृष्णा नदीकाठावर कुठल्याही प्रकारची भीती सध्या नसल्याचे चित्र आहे. पण, पाणी वाढत असल्याने व पाऊस नसल्याने शेतकऱ्यांना पंपसेट काढण्यासाठी व पुन्हा लावण्यासाठी पळापळ करावी लागत आहे.

सध्या राजापूर धरणातून २० हजार क्युसेक पाणी कृष्णा नदीत येत आहे. तर दूधगंगा नदीत ६ हजार ६८० क्युसेक पाणी वाहत आहे. दोन्ही नदींतून कृष्णेत २६ हजार ६८० क्युसेक पाणी वाहत आहे. दरम्यान, चिक्कोडी तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प नोंदले गेल्याने पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. दरम्यान सांगली आणि कर्नाटक विभागाच्या पाटबंधारे विभागाने समन्वय साधून पाणी सोडण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com