Nashik News : गेल्या वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे रब्बी हंगामातील पेरण्यांचे क्षेत्र घटले होते. यंदा समाधानकारक पावसामुळे या पुन्हा वाढ झाल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात १ लाख १३ हजार ५७६ हेक्टर सरासरी पेरणी क्षेत्र आहे.
मागील वर्षी ७६.४७ टक्के पेरण्या झाल्या होत्या तर यंदा १ लाख १४ हजार ३४० हेक्टरवर पेरा झाला आहे. यंदा पेरण्या १०० टक्के झाल्या असून मागील वर्षीच्या तुलनेत २४ टक्क्यांनी पेरण्या वाढल्या आहेत.
समाधानकारक पावसामुळे यंदा विहिरींमध्ये पाणीसाठा असल्याने शेतकऱ्यांनी अंदाज घेऊन पेरण्या केल्या आहेत. सिन्नर तालुक्यात सर्वात जास्त २० हजार १२४ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. तर त्र्यंबकेश्वर तालुक्यात सर्वात कमी ९८० हेक्टरवर पेरण्या आहेत. मागीलवर्षी मालेगाव, येवला, सिन्नर चांदवड व नांदगाव तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने रब्बीचे क्षेत्र कमी होते. यंदा वाढ झाली आहे.
देवळा, नांदगाव, इगतपूरी, येवला, नाशिक व चांदवड तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पेरण्या झाल्या आहेत. तर मालेगांव, कळवण, सुरगाणा, दिंडोरी, पेठ,निफाड तालुक्यात सरासरीपेक्षा कमी मात्र समाधानकारक पेरण्या आहेत. तर बागलाण तालुक्यात ७०.४७ टक्के हे प्रमाण आहे. अन्नधान्य पिकात ज्वारीची सर्वाधिक पेरणी सिन्नर तालुक्यात झाली आहे.
त्यानंतर नांदगाव, येवला, कळवण, मालेगाव, दिंडोरी, बागलाण व नाशिकमध्ये कमी जास्त प्रमाणावर या पेरा आहे. गहू पिकात आघाडीवर असलेल्या निफाड तालुक्यात १० हजार हेक्टरवर पेरण्या आहेत. तर जिल्ह्यात सर्वच तालुक्यात पेरा झालेला आहे. नाशिक व देवळा तालुक्यात सरासरीच्या तुलनेत वाढ दिसून आली आहे.
चाऱ्याची उपलब्धता व मक्याची मागणी असल्याने यंदा जिल्ह्यात मका लागवडी वाढल्याचे दिसून आले. ज्यामध्ये सरासरीच्या नऊपट नांदगाव तालुक्यात ४,१५५ हेक्टरवर लागवडी आहेत. तर मालेगांव, निफाड, येवला व चांदवड तालुक्यात क्षेत्र वाढत असल्याचे चित्र आहे.
तर देवळा, बागलाण तालुक्यातील अनेक भागात लागवडी दिसून येत आहेत. कडधान्य पिकात हरभरा क्षेत्र जिल्ह्यात आहे. तर १५ तालुक्यात यंदा पेरा झालेला आहे.त्यात सिन्नर तालुक्यात सर्वाधिक पेरणी आहे.तर नांदगाव व चांदवड तालुक्यात सरासरीच्या तुलनेत क्षेत्र वाढले आहे.
गळीतधान्य पिकांचे क्षेत्र शून्यावर
जिल्ह्यात गळीत धान्यपिकांचे सरासरी क्षेत्र ५६.८ हेक्टर इतके अत्यल्प क्षेत्र आहे. त्यामध्ये करडई, जवस, तीळ व सूर्यफूल ही पिके पूर्वी घेतली जायची.कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार यंदा जिल्ह्यात जवळपास या चारही गळीतधान्य पिकांचा पेरा शून्यावर आहे. त्यामुळे दिवसेंदिवस तेलबिया क्षेत्र कमी होऊन हद्दपार होण्याची चिन्ह दिसून येत आहे.
पीक सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र(हेक्टर टक्केवारी
ज्वारी ४,०५४.९८ ४,२३८.८ १०४.२७
गहू ६४,१५०.८५ ६०,३२६ ९४.०४
मका ८,४१८.९ १६,१६९.४५ १९२.०६
इतर तृणधान्ये ३१ ०.८ २.५८
हरभरा ३५,०८६.१६ ३०,२३८.८२ ८६.१८
इतर कडधान्ये १,७६७.३७ ३३,०७.८ १८७.१६
एकूण क्षेत्र १,१३,५७६..१ १,१४,३४० १००.६७
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.