Rabi Sowing : हरभरा एक लाख सात हजार, तर मका ३७ हजार हेक्टरवर लागवड

Maize Cultivation : यंदा आतापर्यंत हरभऱ्याची १ लाख ४ हजार ७८६, तर मक्याची ३७ हजार ७१२ हेक्टर पेरणी झाली आहे.
Chana Crop
Chana CropAgrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा रब्बीत हरभरा, मका पीक घेण्याला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. यंदा आतापर्यंत हरभऱ्याची १ लाख ४ हजार ७८६, तर मक्याची ३७ हजार ७१२ हेक्टर पेरणी झाली आहे.

मक्याची सरासरीच्या दुप्पट पेरणी झाली असून हरभऱ्यानेही सरासरी ओलांडली आहे. दर वर्षीपेक्षा यंदा मका, हरभऱ्याकडे शेतकऱ्यांचा कल असल्याचे दिसून येत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र ४ लाख ५८ हजार ६३५ हेक्टर क्षेत्र असून यंदा आतापर्यंत यंदा आतापर्यंत ४ लाख ३६ हजार ७०४ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली आहे.

Chana Crop
Maize Farming : जळगाव जिल्ह्यात मका पिकाच्या क्षेत्रात मोठी वाढ

अहिल्यानगर जिल्ह्यात जामखेड, पारनेर, श्रीगोंदा, अहिल्यानगर, शेवगाव, पाथर्डी, कर्जत या तालुक्यांत रब्बीत ज्वारीचे प्रमुख पीक असते. मात्र अलीकडच्या दहा वर्षांचा विचार केला तर ज्वारीचे क्षेत्र वरचेवर कमी होत आहे. त्याऐवजी हरभरा, मक्याचे क्षेत्र वाढत आहे. त्यातच कृषी विद्यापीठाने हरभऱ्याचे नव नवीन वाण विकसित केले आहे.

शेतीसाठी सध्या सगळ्याच भागात मजूर टंचाई असली तरी यंत्राने काढता येणारे वाण विकसित केले असल्यानेही हरभऱ्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याचे दिसत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात पशुपालन, दूध व्यवसायालाही शेतकरी प्राधान्य देत आहे. चाऱ्यासाठी मुरघास करण्यावर भर असून त्यामुळे मक्याचे क्षेत्र रब्बीत वाढले आहे.

Chana Crop
Chana Cultivation : काबुली हरभरा पेरा पूर्ण

यंदा आतापर्यंत हरभऱ्याची १ लाख ४ हजार ७८६ तर मक्याची ३७ हजार ७१२ हेक्टर पेरणी झाली आहे. मक्याची सरासरीच्या दुप्पट पेरणी झाली असून हरभऱ्यानेही सरासरी ओलांडली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील दक्षिण भागातील दुष्काळी तालुक्यात हरभऱ्याला तर मक्याला उत्तर भागातील बागायती, दुधाचे उत्पादन अधिक असलेल्या भागात प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे.

हरभरऱ्याचे यंदाचे पेरणी क्षेत्र

कंसात मक्याचे क्षेत्र (हेक्टर)

अहिल्यानगर १६४३१ (११४०)

पारनेर ८०८८ (५११)

श्रीगोंदा ७८०० (११६९)

कर्जत १२०३७ (३७६४)

जामखेड ७३६५(७०१)

शेवगाव ७२२१ (०)

पाथर्डी ९६५३ (१५१०)

नेवासा ४२९६ (१३९८)

राहुरी २९८७ (१००८)

संगमनेर ६१९३ (७५६६)

अकोले २१३७ (१२४७)

कोपरगाव ५१२०(४९८३)

श्रीरामपूर ५४४१ (२७८९)

राहाता १०९१७ (३७९२)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com