Rain Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Pune Dam Storage : पुणे जिल्ह्यात धरणांत चोवीस तासांत दहा टीएमसी पाणी

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Pune News : पुणे : जिल्ह्यातील मुळशी, वडिवळे, टेमघर धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे.धरणांत नव्याने पाण्याची वेगाने आवक सुरू आहे. बुधवारी (ता.२४) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत २६ धरणांत नव्याने १०.३४ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा ७१.९२ टीएमसी म्हणजेच ३६ टक्के झाला आहे.

जिल्ह्यात तीन जूनपासून वातावरणात बदल होण्यास सुरवात झाली होती. जिल्ह्यात सात जूनपासून पाऊस सुरू झाला. सुरवातीच्या टप्प्यात कमीअधिक पाऊस होता. मुठा खोरे, नीरा, कुकडी आणि भीमा खोऱ्यातील धरणक्षेत्रात पावसाचा जोर अधिक राहिला. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतातून पाणी वाहिले. ओढेही खळाळून वाहू लागले. त्यामुळे धरणांत
पाण्याची आवक वेगाने सुरू झाली. पावसाचा जोर वाढल्यानंतर या आवकेत वाढ झाली आहे.

सध्या जिल्ह्यातील २६ धरणांतील पाण्याची उपयुक्त क्षमता १९८.३४ टीएमसी आहे. मुळशी धरणक्षेत्रात सर्वाधिक २६६ मिलिमीटर पाऊस पडला. तर टेमघर धरणक्षेत्रात १७० मिलिमीटर, वडिवळे १५०, पवना १४५, वरसगाव, पानशेत ८२, खडकवासला २८, नीरा खोऱ्यातील आंध्रा ८६, गुंजवणी ७८, कळमोडी ६८, भामा आसखेड ६३, नीरा देवघर ६१, कासारसाई ५२, चासकमान ३६ मिलिमीटर, तर कुकडी खोऱ्यातील डिंभे धरणक्षेत्रात सर्वाधिक ५० मिलिमीटर, वडज २६, चिल्हेवाडी २४, माणिकडोह २१, येडगाव ११, तर पिंपळगाव जोगे येथे १६ मिलिमीटर पाऊस पडला. तर इतर धरणक्षेत्रात हलक्या सरी पडल्या.

वडिवळे, खडकवासलातून विसर्ग
वडिवळे आणि खडकवासला धरणे शंभर टक्के भरली आहेत. खडकवासलातून बुधवारी सकाळी सात वाजता ९ हजार ४१६ क्युसेक, तर वडिवळे धरणातून कुंडली नदीपात्रामध्ये दोन हजार १७२ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घेण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

बुधवारी (ता.२४) सकाळी आठ वाजेपर्यंत धरणांत आलेला पाणीसाठा (टीएमसी)
टेमघर ०.२३, वरसगाव ०.६६, पानशेत ०.६४, खडकवासला ०.४७, पवना ०.४१, कासारसाई ०.४१, कळमोडी ०.१६, चासकमान ०.७५, भामा आसखेड ०.४६, आंध्रा ०.२०, वडिवळे ०.३३, गुंजवणी ०.१९, भाटघर १.३५, नीरा देवघर ०.५९, वीर १.१०, पिंपळगाव जोगे ०.२२, माणिकडोह ०.३३, येडगाव ०.०१, विसापूर ०.१३, डिंभे ०.६९, चिल्हेवाडी ०.१४, घोड ०.०१, उजनी १.२०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Cotton Anudan : २६ सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सोयाबीन, कापूस अनुदान जमा होणार; कृषिमंत्री मुंडेंनी दिली माहिती

Agriculture Power Bill : कृषी वीज बिले दुरूस्त करा अन्यथा आंदोलन, इरिगेशन फेडरेशनकडून इशारा

Agriculture Management : पुरातही पिके वाचविणारी ‘एसआरटी’ पद्धत

Agriculture Import Export : आयात-निर्यातीत हवी समयसूचकता

PM Kisan Scheme : पी.एम.किसान योजना; अठराव्या हप्त्यास शेतकरी मुकणार, तेरा हजार खाती आधार लिंकविना

SCROLL FOR NEXT