Water Scarcity Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाईसाठी १० कोटींचा आराखडा तयार

Water Shortage : जिल्हा प्रशासन ‘लर्ट मोड’वर असून, ५९२ ठिकाणी उपाययोजना करण्यास सुमारे ९ कोटी ९० लाख ७६ हजारांचा पाणीटंचाई आराखडा तयार केला आहे.

Team Agrowon

Jalgaon News : जिल्ह्यात यंदा कमी झालेल्या पावसामुळे सुमारे ५९२ गावांत पाणीटंचाईच्या झळा जाणवणार आहेत. जिल्हा प्रशासन ‘लर्ट मोड’वर असून, ५९२ ठिकाणी उपाययोजना करण्यास सुमारे ९ कोटी ९० लाख ७६ हजारांचा पाणीटंचाई आराखडा तयार केला आहे.

सद्यःस्थितीत १२ गावांत १३ टँकर सुरू आहेत. त्यात चाळीसगाव तालुक्यातील विसापूर तांडा, अंधारी, करजगाव, हातगाव, हिरापूर, तमगव्हाण, रोहिणी, राजदेहरे, ब्राह्मण शेवगे, घोडेगाव, हातगाव भिल्लवस्ती या गावांचा समावेश आहे.

दरवर्षी सात जूनला सुरू होणारा पाऊस जूनच्या अखेरीस उशिराने सुरू झाला. एक महिना पावसाची प्रतीक्षा करावी लागली. जुलैमध्ये चांगल्या पावसामुळे खरिपाच्या पेरण्या झाल्या. मात्र ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिल्याने पेरण्या वाया जाण्याची भीती निर्माण झाली. सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस झाल्याने दुबार पेरणीचे संकट टळले.

पण उत्पादनात कमालीची घट झाली. बागायती कापसाचे उत्पादन आले. मात्र कोरडवाहू कापसाचे उत्पादन घटले. सप्टेंबर, ऑक्टोबरमधील पावसाने हतनूर, वाघूर, गिरणा धरणात चांगला पाणीसाठा झाला. हतनूर ९० टक्के, तर वाघूर शंभर टक्के भरले.

त्यामुळे भुसावळ परिसरातील यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, भुसावळ, जामनेर, जळगाव तालुक्यातील पाणीटंचाई मिटण्यास मदत झाली. असे असले तरी चाळीसगाव तालुक्यात कमी पाऊस झाल्याने हा तालुका दुष्काळी जाहीर झाला. इतर अनेक तालुक्यांत कमी पाऊस झाल्याने पाणीटंचाईच्या झळा अधिक तीव्र होणार आहेत.

पाणीटंचाईचे तीन टप्पे

जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाईचे तीन टप्पे केले आहेत :

ऑक्टोबर ते डिसेंबर २०२३ पर्यंत जिल्ह्यातील ४७ गावात पाणीटंचाई जाणवणार

पहिल्या टप्प्यासाठी ४७ ठिकाणी उपाययोजना. त्यासाठी २ कोटी २६ लाख ६० हजारांचा आराखडा

जानेवारी ते मार्च २०२४ मध्ये टंचाईच्या दुसऱ्या टप्प्यात १४९ गावात पाणीटंचाई जाणवणार

दुसऱ्या टप्प्यातील उपाययोजनांसाठी २ कोटी ४३ लाख २ हजारांचा आराखडा

एप्रिल ते जून २०२४ मधील तिसऱ्या टप्प्यात ३९६ गावांत पाणीटंचाईच जाणवणार

तिसऱ्या टप्प्यातील उपाययोजनांसाठी ५ कोटी २० लाख ९४ हजारांचा आराखडा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा 344.74 कोटीं निधी वळवला

Silkworm Monsoon Care: पावसाळ्यात रेशीम अळी संगोपन करताना घ्यावयाची काळजी

Kisan Credit Card: किसान क्रेडिट कार्ड : मत्स्य व्यवसायासाठी आर्थिक सक्षमीकरण

Monsoon Parasite Control: पावसाळ्यातील परजीवी कीटकांचे एकात्मिक व्यवस्थापन

Animal Health Protection: पशू, मानव आरोग्याचे संरक्षण

SCROLL FOR NEXT