Jejuri Temple  Agrowon
ॲग्रो विशेष

Jejuri Development : जेजुरीतील बाह्यवळण रस्त्यास १० कोटी ६८ लाखांवर निधी

Jejuri Bypass Road : महाराष्ट्राचे कुलदैवत श्रीक्षेत्र जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत जेजुरी येथील बाह्यवळण रस्त्यासाठी १० कोटी ६८ लाख ७५ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

Team Agrowon

Pune News : महाराष्ट्राचे कुलदैवत श्रीक्षेत्र जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत जेजुरी येथील बाह्यवळण रस्त्यासाठी १० कोटी ६८ लाख ७५ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नियोजन विभागाने जारी केला आहे.

जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यासाठी २० जून २०२२ रोजी मंजूर केलेल्या १०९ कोटी ५७ लाख रुपयांच्या कामांमध्ये अधिकचे १० कोटी ६८ लाख रुपये मंजूर करून हा नवीन बाह्यवळण रस्ता समाविष्ट केला आहे. श्री. पवार यांच्या सूचनेनुसार प्रस्ताव सादर करून आवश्यक मंजिरी मिळविण्यासह शासन निर्णय जाही करण्याची ही कार्यवाही अवघ्या दीड महिन्यात पूर्ण करण्यात आली.

जेजुरीच्या श्री खंडोबा गड मंदिर आणि शहरविकासासाठी राज्य शासनाच्या वतीने सुमारे ३४५ कोटी निधीचा विकास आराखडा एकूण तीन टप्प्यांत राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील विकास कामासाठी १०९ कोटी ५७ लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्यात आता १० कोटी ६८ लाख रुपये अधिकचे मंजूर करून हा नवीन बाह्यवळण रस्ता समाविष्ट केला आहे.

मुख्य मंदिरातील गाभाऱ्यात डागडुजीचे काम सुरू करण्यात आले. सध्या तटबंदीची दुरुस्ती व जतन, जेजुरी गडकोटातील सर्व ओवऱ्या, सज्ज्यावरील आतील भागात वॉटरप्रूफिंग, प्रदक्षिणामार्गावर दगडी पायऱ्या बसविणे, पूर्व दरवाजा व पश्चिम दरवाजाबाहेरील दगडी पायरी मार्ग तयार करणे ही कामे सुरू आहेत.

पिंपळ वेशी परिसरात पायरी मार्ग दुरुस्ती, कठडे, कमान सुशोभीकरण, बानूबाई मंदिर, हेगडे प्रधान मंदिराबाहेरील कामे सुरू आहेत. मुख्य मंदिरातील गाभारा, सभागृहातील दगडी फरशी तसेच सभागृहातील दगडी खांबांच्या दुरुस्तीचे काम अद्याप बाकी आहे. होळकर व पेशवे तलावाच्या तटबंदीची दुरुस्ती, नवीन दगडी कामे प्रगतिपथावर आहेत.

१०९ कोटी ५७ लाखांचे असे होणार वितरण

  • मंदिर व संपूर्ण तटबंदीचे जतन व दुरुस्ती...११ कोटी २३ लाख रुपये

  • दीपमाळांचे जतन व दुरुस्ती...११ कोटी २५ लाख रुपये

  • उत्तर-पूर्व व पश्चिम पायऱ्या, १३ कमानी, सहायक संरचना जतन आणि दुरुस्ती...१२ कोटी २२ लाख रुपये ऐतिहासिक होळकर व पेशवे तलाव आणि इतर जलकुंडांचे जतन व दुरुस्ती...१२ कोटी ५६ लाख रुपये

  • मल्हार गौतमेश्वर मंदिर, लवथळेश्वर व बल्लाळेश्वर मंदिरांचे जतन व दुरुस्ती...२ कोटी २ लाख रुपये

  • कडेपठार मंदिर दोन पायरी मार्गांचे जतन व दुरुस्ती...१० कोटी ७३ लाख रुपये

  • मूलभूत पायाभूत सुविधा...१२ कोटी रुपये

  • भूदृष्ये विकसित करण्यासाठी १८...लाख रुपये

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget 2026: कृषी शिक्षण, संशोधनावरील तरतूद वर्षागणिक तोकडीच

Bharat-VISTAAR AI: अर्थसंकल्पातून 'भारत विस्तार एआय'ची घोषणा, याचा शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Sandlwood Cultivation : चंदन लागवडीसाठी अर्थसंकल्पात तरतूद; पाच राज्यांमध्ये चंदनाची सर्वाधिक लागवड

Groundwater Management: सर्व विभागाच्या समन्वयातून भूजल व्यवस्थापनाची गरज

Union Budget 2026: कृषी, ग्रामीण उद्योगासह शेतकरी हिताचा संकल्प

SCROLL FOR NEXT