Free Electricity Agrowon
ॲग्रो विशेष

Free Electricity : बळीराजा मोफत वीज योजनेत लातुरात १ लाख ४१ हजार लाभार्थी

Baliraja Free Electricity Scheme : राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या (एचपी) शेतीपंपांना पुढील पाच वर्षे मोफत वीज देण्याचा निर्णय घेत मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना हाती घेतली आहे.

Team Agrowon

Latur News : राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या (एचपी) शेतीपंपांना पुढील पाच वर्षे मोफत वीज देण्याचा निर्णय घेत मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना हाती घेतली आहे. या योजनेत लातूरपेक्षा धाराशिव जिल्ह्यात जास्त लाभार्थी असणार आहेत. या योजनेचा लातूर जिल्ह्यातील एक लाख ४१ हजार ६४३ तर धाराशिव जिल्ह्यातील एक लाख ५३ हजार ७०७ शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.

हवामानातील बदल व पावसाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसायावर मोठा परिणाण झाला असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. या शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे.

यातूनच सरकारने साडेसात एचपीपर्यंत शेतीपंपांसाठी पुढील पाच वर्षे मोफत वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना जाहीर केली आहे. या योजनेचा शासन निर्णय नुकताच जारी झाला असून योजनेत वीजबिलाचा भार उचलण्याचे सरकारने ठरवले आहे.

राज्यातील ४४ लाख ३ हजार शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना शंभर टक्के मोफत वीज दण्यात येणार असून त्यासाठी सरकारकडून महावितरणला १४ हजार ७६० कोटी रुपये अनुदान देण्यात येणार आहे. मार्च २०२४ अखेर राज्यात ४७ लाख ४१ हजार शेतकरी ग्राहक असून एकूण ग्राहकांमध्ये १६ शेतकरी ग्राहक आहे.

वीज वापरापैकी तीस टक्के ऊर्जेचा वापर शेतीसाठी होतो. सध्या शेतीचा वार्षिक वीज वापर ३९ हजार २४६ दशलक्ष युनिट आहे. शेतीपंपांना रात्री ८ ते १० तास किंवा दिवसा ८ तास थ्री फेज वीज देण्यासाठी चक्राकार पद्धतीचा अवलंब करण्यात येतो. मुख्यमंत्री बळीराजा योजना एप्रिल २०२४ ते मार्च २०२९ पर्यंत राबववण्यात येणार असल्याचे महावितरणच्या सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होण्यास सुरुवात, जयकुमार गोरेंची माहिती

Nagpur Agriculture : नागपुरात कृषी विभागाचा कारभार रामभरोसे; पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीला ब्रेक!

Karjmafi Glitches : शेतकऱ्यांची कोंडी: सरकारच्या तांत्रिक चक्रव्यूहात अखेरची कर्जमुक्ती योजना अडकली!

November Rain: नोव्हेंबरमध्ये एमजेओमुळे पावसाचे प्रमाण वाढणार आहे का ?

Scheme Glitches : सातारा जिल्ह्यात शासकीय योजनांच्या त्रुटींचा जाच; लाभाऐवजी शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतोय मनस्ताप!

SCROLL FOR NEXT