Free Electricity Scheme : सिंचनासाठी या राज्यात शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज

Mahesh Gaikwad

मोफत वीज

वैयक्तिक कूपनलिका असणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची योजना राबविण्याचा निर्णय उत्तर प्रदेश सरकारने घेतला आहे.

सिंचनासाठी वीज

शेतकऱ्यांना मोफत वीज सिंचनासाठी दिली जाणार आहे. परंतु या योजनेच्या लाभासाठी काही नियम आणि अटी घालण्यात आल्या आहेत.

वीजबील

३१ मार्च २०२३ पर्यंतचे वीजबील ज्या शेतकऱ्यांनी भरले आहे. अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

वीज कनेक्शन

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे वीज कनेक्शन आणि मीटर असणे गरजेचे आहे. तसेच योजनेसाठी शेतकऱ्यांना केवायसीची प्रक्रियाही करणे आवश्यक आहे.

योजनेचा लाभ

योजनेचा लाभ घेताना शेतकऱ्यांना त्यांच्या दुसऱ्या वीज कनेक्शनबाबतची माहितीही द्यावी लागणार आहे.

कूपनलिका

मोफत वीज दिल्या जाणारे कनेक्शन केवळ कूपनलिकेसाठीच वापरावे लागणार आहे. दुसऱ्या उपकरणांमध्ये एक पंखा आणि एक एलईडी लाईट वापरण्याची परवानागी असणार आहे.

१३०० युनिट वीज मोफत

या योजनेतंर्गत युपीच्या बुंदेलखंडच्या शेतकऱ्यांना १३०० युनिट वीज प्रतिमहिना मोफत मिळणार आहे. तर राज्यातील इतर शेतकऱ्यांना १०४५ युनिट वीज मोफत मिळणार आहे.