Chhatrapati Sambhajinagar News: मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत पंतप्रधान पीक विमा योजना खरीप हंगाम- २०२४ मध्ये पीक विमा उतरविणाऱ्या एकूण अर्जांपैकी १ लाख १० हजार ७२९ पीक विमा अर्ज रद्द करण्यात आले आहेत. पीक विमा कंपनीच्या वतीने कृषी विभागाकडे आलेल्या अहवालानुसार ही माहिती समोर आली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २४७९ पीक विमा अर्ज रद्द करण्यात आले आहेत. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील १४८, गंगापूर मधील १०४, कन्नड ६८, खुलताबाद ४५७, पैठण ४९०, फुलंब्री २०५, सिल्लोड ४१५, सोयगाव ३२८ तर वैजापूरमधील २६४ पीक विमा अर्जांचा समावेश आहे. जालना जिल्ह्यातील ११ हजार २३९ पीक विमा अर्ज रद्द करण्यात आले. त्यामध्ये अंबडमधील ९१, बदनापूरमधील २७५२, भोकरदनमधील २२६३, घनसावंगीमधील ४८,
जाफराबादमधील ५९७, जालन्यातील २९४२, मंठामधील २४८१, परतूरमधील ६५ पीक विमा अर्जाचा समावेश आहे. बीड जिल्ह्यातील सर्वाधिक ९७ हजार ०११ पीक विमा अर्ज रद्द करण्यात आले आहेत. त्यामध्ये आंबाजोगाई तालुक्यातील ३५२९, आष्टीमधील २६ हजार ६४३, बीडमधील १०२३, धारूरमधील १३४९, गेवराईतील ३४ हजार २५८, केज मधील ९६५१, माजलगावमधील ४५४४, परळीतील ११ हजार १४२,
पाटोद्यातील ३०६८, शिरूर कासार मधील ८८६, तर वडवणी तालुक्यातील ९१८ खरीप पीक विमा अर्जाचा समावेश आहे. फळ पिकांचा विमा उतरवताना निदर्शनास आलेल्या बाबीनंतर कृषी विभागाकडून प्रत्यक्ष क्षेत्र पाहणी करण्यात आली होती. त्यामध्ये ही अशाच प्रकारे अर्ज रद्द करण्यात आले होते अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
सव्वा लाख हेक्टरवर क्षेत्र झाले होते विमा संरक्षित
रद्द करण्यात आलेल्या तीनही जिल्ह्यांतील एक लाख दहा हजार ७२९ खरीप पीक विमा अर्जाच्या माध्यमातून १ लाख २९ हजार ८७९ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आले होते. तर या खरीप पीक विम्याची संरक्षित रक्कम तब्बल १३१ कोटी ६७ लाख ३४ हजार इतकी होती.
शेतकऱ्यांनी आपल्या पेरणी केलेल्या क्षेत्राचा व पिकाचाच विमा उतरवायला हवा. सोबतच ई-पीक पाहणी करायलाच हवी.डॉ. तुकाराम मोटे, विभागीय कृषी सहसंचालक, छत्रपती संभाजीनगर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.