Crop Insurance: १८ लाख शेतकऱ्यांना पीकविम्याची अग्रिम भरपाई मंजूर

राज्यात यंदा चार जिल्ह्यांमध्ये २५ टक्के अग्रीम भरपाई देण्यासाठी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढल्या होत्या. त्यापैकी एका जिल्ह्यात कंपनीने अधिसूचना फेटाळत अग्रिम भरपाई देण्यास नकार दिला. तर तीन जिल्ह्यांमध्ये अग्रिम भरपाई मिळणार आहे. हे तीन जिल्हे म्हणजे नांदेड, परभणी आणि हिंगोली. या तीन जिल्ह्यांमधील १८ लाख ८४ हजार शेतकऱ्यांना ७०५ कोटी रुपयांची अग्रिम भरपाई मिळणार आहे.

राज्यात यंदा चार जिल्ह्यांमध्ये २५ टक्के अग्रीम भरपाई देण्यासाठी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढल्या होत्या. त्यापैकी एका जिल्ह्यात कंपनीने अधिसूचना फेटाळत अग्रिम भरपाई देण्यास नकार दिला. तर तीन जिल्ह्यांमध्ये अग्रिम भरपाई मिळणार आहे. हे तीन जिल्हे म्हणजे नांदेड, परभणी आणि हिंगोली. या तीन जिल्ह्यांमधील १८ लाख ८४ हजार शेतकऱ्यांना ७०५ कोटी रुपयांची अग्रिम भरपाई मिळणार आहे. तीन जिल्ह्यांमध्ये अग्रिम भरपाई देण्यासाठी कंपन्या तयार झाल्या आहेत. परभणी जिल्ह्यात सर्वाधिक २९६ कोटी ८८ लाख रुपयांची अग्रिम भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २५४ कोटी ५९ लाख रुपये अग्रीम भरपाई मंजूर करण्यात आली. तसेच हिंगोली जिल्ह्यातील शेकऱ्यांना १५४ कोटी ३६ लाख रुपये अग्रीम भरपाई मंजूर करण्यात आली. असे तीन जिल्ह्यांमध्ये एकूण ७०५ कोटी ८४ लाख रुपये भरपाई मिळणार आहे. तर  १८ लाख ८४ हजार शेतकऱ्यांना ही भरपाई मिळणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com