Mahatma Jyotirao Phule Farmers Debt Relief Scheme  Agrowon
ॲग्रो विशेष

Farmers Incentive Scheme : प्रोत्साहन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना १ कोटीचा लाभ

Farmer Loan Waive : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेत पात्र असणाऱ्या जिल्ह्यातील ८७ हजार ८५९ लाभार्थांची यादी शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली होती.

Team Agrowon

Sangli News : ‘‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेमध्ये सांगली जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी गेल्या महिन्यात आधार प्रमाणीकरण केले आहे. अशा २५६ शेतकऱ्यांना १ कोटी १७ लाख रुपयांचा लाभ देण्यात आला आहे,’’ अशी माहिती जिल्हा उपनिबंधक सहकार मंगेश सुरवसे यांनी दिली.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेत पात्र असणाऱ्या जिल्ह्यातील ८७ हजार ८५९ लाभार्थांची यादी शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यापैकी ८७ हजार ४०७ इतक्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले.

त्यापैकी ८० हजार ३३७ लाभार्थ्यांच्या खात्यावर २९४ कोटी ७ लाख रुपये इतकी रक्कम वर्ग करण्यात आली होती. या योजनेतील ४५२ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले नसल्याने आधार प्रमाणीकरणाची संधी १२ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीत देण्यात आली होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीत आधार प्रमाणीकरण केलेल्या जिल्ह्यातील २५६ शेतकऱ्यांच्या खात्यावर १ कोटी १७ लाख प्रोस्ताहनपर लाभाची रक्कम वर्ग करण्यात आली आहे.

तसेच ज्या शेतकऱ्यांचा आधार प्रमाणीकरण करण्यापूर्वी मृत्यू झाला आहे, अशांच्या वारसांची नावे योजनेच्या पोर्टलवर समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेनंतर आधार प्रमाणीकरण व योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Result 2024 : विधानसभा निवडणूक निकालानंतर काय म्हणतायत राजकीय नेते?

Mahayuti Sarkar Formation Formula : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला?; अजित पवारांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड

Congress On Mahayuti : लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफीसह जनतेला दिलेल्या आश्वासनांची भाजप महायुतीने पुर्तता करावी; काँग्रेसची मागणी

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेते पदी अजित पवार 'पुन्हा' ; आमदारांच्या बैठकीत निवड

Soybean Productivity : शासकीय खरेदीसाठी सोयाबीनची उत्पादकता जाहीर

SCROLL FOR NEXT