Farmer Incentive Scheme : आधार प्रमाणीकरणासाठी सप्टेंबरपर्यंतची मुदत

Aadhar Authentication : पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून प्रोत्साहनपर लाभ दिला जातो.
Loan Waive Scheme
Loan Waive Scheme Agrowon
Published on
Updated on

Solapur News : पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून प्रोत्साहनपर लाभ दिला जातो. या लाभासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने पन्नास हजार रुपये दिले जातात.

या लाभासाठी पात्र ठरलेल्या व आधार प्रमाणीकरणामुळे लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने आता प्रमाणीकरणास ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. या शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी आवश्‍यक असलेला निधी सध्या शासकीय तिजोरीत उपलब्ध आहे.

Loan Waive Scheme
Farmers Incentive Scheme : शेतकऱ्यांना ५० हजार अनुदान द्या : पाटील

हे पैसे योग्य व पात्र लाभार्थ्यांनाच मिळावेत यासाठी आधार प्रमाणिकरण आवश्‍यक आले आहे. या योजनेतून राज्यभरातील ३३ हजार ३५६ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण करण्यासाठी १२ ऑगस्ट ते १८ सप्टेंबर या कालावधीत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.

Loan Waive Scheme
Farmers Incentive Subsidy Scheme : प्रोत्साहन अनुदानापासून ३३ हजार शेतकरी वंचित

या कालावधीत १८ हजार १६३ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे. अद्याप १५ हजार १९३ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण प्रलंबित आहे. जिल्हा उपनिबंधक गायकवाड म्हणाले, ९ सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणिकरण करून घेण्याची जिल्ह्यातील २६९ खाती शिल्लक होती. त्यापैकी ३३ खात्यांचे आधार प्रमाणिकरण झाले आहे. सध्या २३६ खात्यांचे आधार प्रमाणिकरण बाकी असून त्यातील १२४ खातेदार मयत आहेत.

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शासनाने प्रोत्साहन अनुदान दिले आहे. या अनुदानाचा लाभ पात्र शेतकऱ्यांना व्हावा यासाठी आम्ही सूक्ष्म नियोजन केले आहे. शेतकऱ्यांनी ज्या बँकेत कर्ज खाते आहे, त्या बँकेत जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे.
- किरण गायकवाड, जिल्हा उपनिबंधक, सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com