Gram
Gram Agrowon
बाजारभाव बातम्या

नांदेडमध्ये ४० हजार क्विंटल हरभरा खरेदी

टीम ॲग्रोवन 

नांदेड : जिल्ह्यात पणन, विदर्भ को-ऑपरेटीव्ह व महाएफपीसीकडून(Vidarbha Co-operative and MahaFPC) हमीभावाने जिल्ह्यात हरभरा(Chana) खरेदी सुरू आहे. खरेदी केंद्रांत ४० हजार क्विंटल हरभरा खरेदी झाली, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयाकडून मिळाली.

जिल्ह्यात किमान आधारभूत किंमत योजनेनुसार हरभरा(Gram) खरेदी होत आहे. खासगी बाजारात हरभऱ्याचे(Gram) दर पडल्यामुळे विक्रीपूर्व नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा हरभरा (Gram)खरेदी केंद्रावर येत आहे. मागील काही दिवसांत शासकीय खरेदीला गती आली आहे. त्यामुळे यंदा विक्रमी हरभरा खरेदी होण्याची शक्यता आहे.

पणन अधिकारी कार्यालयाकडून दहा ठिकाणी सुरु असलेल्या खरेदी केंद्रांत एक हजार ३३९ शेतकऱ्यांचा(Farmer) १९ हजार ६५९ क्विंटल हरभरा(Gram) खरेदी झाला आहे. विदर्भ को-आपरेटिव्हकडून तीन ठिकाणी खरेदी केंद्रे सुरु आहेत. या तीन ठिकाणी १२ हजार ६५६ क्विंटल हरभरा खरेदी होत आहे. तर, महाएफपीसी(MAHAFPC) पुणेकडून जिल्ह्यात २० ठिकाणी हरभरा खरेदी होत आहे. या ठिकाणी आठ हजार क्विंटल हरभरा खरेदी होत असल्याची माहिती गणेश बिरू यांनी दिली.

शेतकऱ्यांनी(Farmer) पेरा नोंदवून विक्रीपूर्व नोंदणी करण्याचे आवाहन यंत्रणेकडून करण्यात येत आहे. जिल्ह्यात मागील वर्षी रब्बी हंगामात पावणेतीन लाख हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली होती. त्यामुळे यंदा जिल्ह्यात हरभऱ्याची(Gram) शासकीय खरेदी विक्रमी होण्याचा अंदाज आहे. शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्रांत हरभरा(Gram) विक्रीला नेण्यापूर्वी चाळून, स्वच्छ करून न्यावा, असे आवाहन करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cow Rearing : गोपालनात ऋतुनिहाय बदलांना प्राधान्य

Animal Care : जनावरांमधील धनुर्वातावर उपाययोजना

Ravindranath Tagor : चीनवर मोहिनी घालणारा साहित्यिक

Animal Care : वाढत्या तापमानात जनावरांचे व्यवस्थापन

Lok Sabha Elections : चुरशीने मतदान; सकाळी ९ पर्यंत कोल्हापूर ८.०४ टक्के तर हातकणंगले ७.५५ टक्के मतदानाची नोंद

SCROLL FOR NEXT