तीन हजार ७६१ क्विंटल हरभरा हमीभावाने खरेदी

परभणी : किमान आधारभूत किंमत (एमएसपी) खरेदी योजनेंतर्गत हमीभावाने (प्रतिक्विंटल ५२३० रुपये) हरभरा विक्रीसाठी शनिवार (ता.१२) पर्यंत परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतील १७ केंद्रांवर १० हजार १९७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली.
Three thousand 761 quintals Buy a gram guaranteed
Three thousand 761 quintals Buy a gram guaranteed

परभणी  : किमान आधारभूत किंमत (एमएसपी) खरेदी योजनेंतर्गत हमीभावाने (प्रतिक्विंटल ५२३० रुपये) हरभरा विक्रीसाठी शनिवार (ता.१२) पर्यंत परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतील १७ केंद्रांवर १० हजार १९७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी १० केंद्रांवर २५७ शेतकऱ्यांच्या ३ हजार ७६१.५० क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

परभणी जिल्ह्यात ‘नाफेड’तर्फे पणन महासंघाच्या परभणी, जिंतूर, बोरी (ता. जिंतूर), सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, पूर्णा या आठ केंद्रांत ४ हजार ४५० शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. परभणी, बोरी, मानवत, पूर्णा या चार केंद्रांत १४२ शेतकऱ्यांनी १ हजार ७५८.५० क्विंटल हरभऱ्याची विक्री केली. अन्य केंद्रावर खरेदी नाही.

हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कन्हेरगाव (ता.हिंगोली), कळमनुरी, वारंगफाटा, वसमत, जवळा बाजार (ता. औंढानागनाथ), सेनगाव, साखरा या आठ केंद्रांत एकूण ४ हजार ८६३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. सात केंद्रांत १ हजार ६६५ शेतकऱ्यांना एसएमएस पाठविले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com